
तब्बल दहा दिवसात केला माउंट एव्हरेस्टचा कॅम्प
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
नुकताच संभाजीनगर एस. आर. पी. एफ. बल गट क्रमांक 14 चे समादेशक श्री विक्रम साळी यांनी माऊंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प 5340 मीटर उंच दहा दिवसात सर केला.त्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागचे प्रमुख डॉ. संजय तिरथकर व मल्ल खांब विभाग कोषाध्यक्ष प्रा. संतोष इंगोले यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
विक्रम साळी यांनी विद्यार्थी जीवना मध्ये तसेच पोलीस फोर्स जॉईन केल्यानंतर अनेक विक्रम प्रस्थापित केले. सायकलिंग, कुस्ती, एडवेंचर स्पोर्ट्स व ट्रेकिंग या अनेक यामध्ये आवड असणारे साळी अमरावतीमध्ये . समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण करण्याचा महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. श्री हनुमान व्यायाम प्रसादक मंडळाची हेल्पलाइन यांचा फार जवळचा संबंध त्यांचा होता . श्री हनुमान प्रसाद मंडळामध्ये नियमित व्यायाम करायचे . हेल्पलाइन चे हाजी रामु शेठ ,हाजी मुस्ताक त्यांनी . जातीय सलोखा कायम रखण्यात मदत केली. साळी साहेबांच्या यशस्वी कामाबद्दल श्री हनुमान प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव डॉ माधुरी चेंडके, श्रीकांत चेंडके एड. प्रशांत देशपांडे प्रा.रवींद्र खांडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील कार्य करिता शुभेच्छा दिल्या.