अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित भगवान सर्व श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन सोहळ्यानिमित्त भव्य विद्वत परिषद राजधानी दिल्ली येथे पार पडली. या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांनी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी तथा आचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा यांचे डॉ. गवई यांनी पुष्पगुच्छ व शाल–श्रीफळ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. भगवान श्रीचक्रधर स्वामींच्या कार्याचा उल्लेख करताना डॉ. गवई म्हणाले की, “संत परंपरेत श्रीचक्रधर स्वामी हे अद्वितीय संत होते. त्यांनी समाजातील विषमता दूर करून भक्ती, नीतिमत्ता व समाजसुधारणा यांचा संदेश दिला. आजच्या पिढीला स्वामींच्या शिकवणीतून सामाजिक ऐक्य व सद्भावाचा बोध घ्यायला हवा.”यावेळी देशभरातील विद्वान, संत-महंत, संशोधक, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिनिधींचे दिल्लीकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक कार्य विभागाने केले होते.डॉ. गवई यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि संत वारशाचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
