धामणगाव रेल्वे /गजानन फिरके
दिनांक १०/१०/२०२५ शुक्रवार रोजी तहसील कार्यालयावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच शेतकऱ्यांच्या वतीने धामणगाव तालुका अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले मागील ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार तक्रार देण्यात आल्या परंतु प्रशासनाने अहवाल पाठवताना ११०० हेक्टरचा अहवाल नुकसानीचा पाठवला होता आणि त्यातही 32 टक्के नुकसान दाखवण्यात आले त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दोन चार हजार रुपये जमा जमा होत आहे परंतु शासनाच्या वतीने सरसकट नुकसान भरपाई चा जीआर ९/१०/२०२५ रोजी काढण्यात आला त्यामध्ये धामणगाव तालुका अतिवृष्टीमध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश तालुक्यामध्ये निर्माण झाला त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी तहसील कार्यालयावर दुपारी ११ वाजता पासून हे आंदोलन करण्यात आले.

ते आंदोलन कर्त्यांनी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली त्यावेळी असे माहित पडले की तहसील प्रशासनाने सततच्या पावसाचा १०० टक्के अहवाल हा शासनाकडे पाठवलाच नाही काल शासनाचा जीआर आल्यानंतर दिनांक ९/१०/२०२५ रोजी हा अहवाल शासनाकडे पाठवण्याचे प्रशासनाने नाकर्तेपणा दाखवला त्यामुळे स्थानिक आमदार व तहसील प्रशासन यांनी धामणगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले होते आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे १०/१०/२०२५ आज रोजी जिल्हाधिकारी यांनी तसेच आयुक्त महसूल यांनी हा अहवाल शासनाला पाठवला त्यामध्ये धामणगाव ३१७४० हजार हेक्टर ची शंभर टक्के नुकसानाची आकडेवारी शासनाला पाठवली तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी तसेच आयुक्त यांच्या पत्राच्या अनुषंगाने विनंती केल्यानुसार हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आता आकडेवारीनुसार शासनाने जीआर काढल्यास शेतकऱ्याला मदत मिळण्यास मार्ग निघेल परंतु प्रशासनावर आमदाराचे अंकुश नसल्यामुळे ही दयनीय परिस्थिती शेतकऱ्यावर औढवुन घेतली आहे दिवाळीच्या आधी धामणगाव तालुका जीआर मध्ये समाविष्ट होऊन नुकसानीचे पैसे न मिळाल्यास उपविभागीय कार्यालयावर चांदुर रेल्वे १७/१०/ २०२५ रोजी काळी दिवाळी करण्याचे माननीय माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वामध्ये करण्याचे ठरले आहे आंदोलनाच्या वेळेस बँकेचे संचालक श्रीकांत जी गावंडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखेडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप मुंदडा, चंदू डहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निमकर, मोहन पाटील घुसडीकर ,महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिताताई मेश्राम,युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर दुबे, शहर युवक आशिष शिंदे,ऋषिकेश जगताप, समीर पाटील,अज्जू पठाण, मंगेश बोबडे, मुकुंद माहोरे, सचिन समोसे, मुकेश राठी, अविनाश मांडवगणे, हरीश चवरे ,विलास डुकरे, दिनकरराव जगताप, शुभम भोंगे,प्रशांत सबाने, सुनील भोगे,रुपेश गुल्हाने, पवन खुरपडे, गजानन पाटील, निलेश चौधरी, अनिसखा पठाण ,निवृत्ती वैद्य, विनोद तायडे, शुभम तरोणे, अनिल धांडे, रमाकांत इंगोले, प्रमोद रोंघे, रोहित रोंगे, रवींद्र जुनेवाल, विनीत टाले,सलीम पठाण, अतुल इंगोले, मनोज ढोबळे, विलास चौधरी, पुरुषोत्तम ऊडाखे, मीनाक्षी ठाकरे, प्रशांत हुडे, राजू गायकवाड, चंद्रशेखर गायकवाड, बादल अडकणे, आकाश झेले, महेश भेंडारकर, विशाल बंमनोटे राजेश रोकडे, विशाल रोकडे, पंकज टाले, नरेश गावंडे, धनंजय शेलोकार, संदीप दावेदार,असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
