मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालयात शिष्यवृत्ती वितरण समारोह संपन्न
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
महात्मा गांधी यांचे १५५ वे जयंतीवर्ष सर्वत्र साजरे करण्यात येत असतानाच यावर्षी श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल द्वारा संचालित मातोश्री कृष्णाबाई देशमुख प्रभू कॉलनी अमरावती येथे २ ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख (तळवेलकर) यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाने शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न करण्यात आला.याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणामधे मातोश्री कृष्णाबाई विद्यालय म्हणजे विद्यार्थाच्या कला गुणांना वाव देणार व्यासपीठ आहे असे उदगार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजाभाऊ देशमुख (तळवेलकर) यांनी काढले.

यावेळी मंचावर प्रमुख उपस्थितीत नरेंद्र देशमुख (सचिव श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल), प्रा. डॉ.पी. आर. एस. राव ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती), कार्तिक इंगोले महाराज (माजी विद्यार्थी तथा युवा किर्तनकार /व्याख्याते), अनिल देशमुख, नंदूभाऊ देशमुख (शाळा समिती सदस्य, अमरावती ), प्रा.प्रविण विधळे (शाळा समिती सदस्य, अमरावती ),श्रीमती ज्योतीताई गिरी (शाळा समिती सदस्य, अमरावती ),माजी मुख्याध्यापक भय्या मोहोड, सोपानदेव पळसपगार (मुख्याध्यापक आदर्श विद्यालय जवळा शहापूर ), राजेंद्र कुमरे (मुख्याध्यापिक शिवराय माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, घाटलाडकी) इत्यादी उपस्थित होते.याप्रसंगी वर्ग ७ ची विद्यार्थिनी स्वरा प्रविण कदम व वर्ग ९ ची विद्यार्थिनी सान्हवी सिध्दार्थ खोब्रागडे या विद्यार्थीनिंनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रा.पी.आर.एस. राव ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती), कार्तिक इंगोले महाराज (माजी विद्यार्थी तथा युवा किर्तनकार /व्याख्याते) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच दि.२ ऑक्टोबरला जन्मदिन असणाऱ्या सोहम बाळे, निर्मल भुरभूरे या विद्यार्थांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.

सोबतच विद्यार्थांचा सन्मान म्हणून स्व. विनायकरावजी ठाकरे, स्व.आशाताई पंजाबराव देशमुख, स्व. राधाबाई देशमुख, स्व. नर्मदाबाई जवंजाळ, स्व. बाबारावजी शेंडे, स्व. रामसिंग सूर्यभानजी मालवे, स्व. चंद्रभागाबाई रामसिंग मालवे , स्व. चंद्रकांतजी वि. देशमुख, स्व. शैलेश कोल्हेकर, स्व. मालीनीबाई वि. ठाकरे, स्व. प्राजक्ता अ. देशमुख स्मृती शिष्यवृत्ती विविध दानशुर दात्यांनी शाळेतील विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य प्राप्त करणारे विद्यार्थी व शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम,मुमेन्टो व प्रमाणपत्र देऊन या वर्षी कु.प्राची युवराज वासनिक,वेदांत गजानन वाघ, सुमित उमेश उके, कु.तन्वी सतिश घरडे, मंथन निलेश शेंडे, कु. वैष्णवी सुरेंद्र धांदे,सोहम शिवदास गावंडे, कु.स्वरा प्रविण कदम, कु. खुशी युवराज वासनिक, कु.निधी विठ्ठल वानखडे, विनय विजय चव्हाण, कु. मानवी सुधिर बोरकर,कु.पुर्वा गजानन बोंद्रे, रुद्रेश आकाश धनगावकर,आदर्श विद्यार्थी म्हणून भावेश इंगोले या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमामधे शारदा स्तवन, स्वागतगीत, वैष्णवजनतो (भजन), सामुहिक गीत हे कु. मयुरा कांडलकर व गीत मंचाच्या मुली यांनी तबला पेटीवर गायले,कार्यक्रमाचे संचालन सारीका वानखडे तर प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद तिरमारे तर शेवटी आभार ज्योती झाडे यांनी मानले.कार्यक्रमाचे सांगता वंदेमातरम या गीताने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विनोद तिरमारे, पर्यवेक्षक अतुल देशमुख,रविंद्र मनकर्णाबाई रामकृष्ण सोळंके,ज्योती झाडे, सारिका वानखडे, निलेश विधळे, मयुरा कांडलक्र,कविता देशमुख, गजानन मालवे, राजेश कोल्हेकर, बाबाराव खंडाळे व विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती रविंद्र रामकृष्ण सोळंके यांनी दिली.
