अमरावतीच्यावतीने डॉ. मनीष गवई यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक न्याय क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
भारत सरकारच्या National Commission for Backward Classes (एनसीबीसी) मध्ये सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर माजी महापौर श्रीमती Kiranatai Mahalle यांनी आज नवी दिल्ली येथे अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे अमरावती शहरासह संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत अमरावतीचे सुपुत्र Dr. Manish Shobha Shankarrao Gawai यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. डॉ. गवई हे माननीय अध्यक्ष, सामाजिक न्याय मंत्रालय यांचे खाजगी सचिव असून भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार विशेष निमंत्रित सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी किरणताई महल्ले यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी त्या प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अमरावती शहरातून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.किरणताई महल्ले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्या प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी नमूद केले.दरम्यान, अमरावतीतील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या नियुक्तीमुळे प्रदेशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
