
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
जि.प. शाळा खेड़ पिंपरी येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रीय सणाला विशेष स्वरूप दिले.”एक पेड़ मां के नाम” या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. प्रभातफेरी काढून गावात हरित संदेश पोहोचविण्यात आला. शाळा सुशोभित करण्यासाठी शाळेच्या कंपाऊंडभोवतालचे 25 वर्षांपासूनचे अतिक्रमण 12 ऑगस्ट रोजी सरपंच मंगेश कांबडे यांच्या पुढाकाराने हटविण्यात आले.
परिसर स्वच्छ करून तिथे वृक्षारोपण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व भाषणांद्वारे व्यक्त केले. प्रा. बलदेव घुगे यांनी प्रस्तावना मांडली. अध्यक्षस्थान भूषविताना सरपंच मंगेश कांबडे यांनी जी.प. शाळा वाचविण्याच्या आपल्या प्रयत्नांची माहिती दिली व शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्देश दिले. तसेच गावातील व्यर्थ खर्च थांबवून तो उच्च शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित ग्रामसभेत 100 हून अधिक नागरिक साक्षर झाले. ग्रामसभेत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड, विकासकामांवरील चर्चा व आवश्यक निर्णय घेण्यात आले.या प्रसंगी उपसरपंच सुधीर देवतडे, सदस्य अनिकेत चौधरी, महादेव जाधव, विद्या खंडारे, मंजुषा अंबाडारे, कर्मचारी गजानन चौधरी, अमित चौधरी, राहुल जाधव, शिक्षक घुगे प्रा., मोहड सर, चव्हाण सर, मंगला मॅडम, कनसे मॅडम, आंगणवाडी सेविका सत्यवती चोरे, यशोदा खंडारे, पोलिसपाटील विष्णु चौके तसेच गावकरी, महिला व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.