
सावीत्री ब्रिगेडच्या जयश्रीताई कुबडे आक्रमक
अमरावती/ रामचंद्र मुंदाने
स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’चा नारा देत अमरावती शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आवाहन करत शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु अमरावती शहरातील नवसारी प्रभागातील कठोर नाका परिसरामध्ये सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेल्या या कचऱ्यामुळे डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.पावसाळा सुरू होण्याआधीच शहरात मनपा कडून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’ म्हणत स्वच्छता मोहिमेला सुरुवात तर केली पण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे विविध प्रकारच्या आजारांची धास्ती अन् शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा सवाल सावित्री ब्रिगेड अमरावतीच्या अध्यक्षा व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या जयश्रीताई कुबडे यांनी उपस्थित केला आहे . पावसाळा आधीच मे महिन्यात शहर स्वच्छतेसाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता नक्की स्वच्छतेचे काय काम झाले? असा प्रश्न निर्माण होत आहे.नवसारी प्रभागातील कठोरा नाका परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. खराब झालेले अन्न, प्लास्टिक पिशव्या, बाॅटल्स, एक्स्पायर झालेल्या विविध वस्तू या कचऱ्यात आढळतात. परीसरातील नागरिकांना येथील घाण पाहता येथूनच आरोग्याचा धोका होईल अशी भिती आहे. त्यामुळे मनपाच्या संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देवून स्वच्छता मोहिम हाती घ्यावी तसेच जिथे कंटेनर ची आवश्यकता आहे तेथे कंटेनर ठेवण्यात यावे अशी मागणी नवसारी प्रभागातील धडाडीच्या कार्यकर्त्या व सावित्री ब्रिगेड अमरावती च्या महिला अध्यक्षा जयश्रीताई कुबडे यांनी मनपा ऊपायुक्त श्रीमती मेघना वासणकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.