कंत्राटदारांनी दिला आंदोलनाचा इशारा
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये सन 2023-24 व 2024- 25 मध्ये नगर विकास विभाग, सामाजिक न्याय, ग्रामविकास विभाग व इतर विभागाची कोट्यावधी रुपयाची कामे पुरेसा निधी उपलब्ध नसताना सुद्धा काढल्या गेली व लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा विचार करता लोकप्रतिनिधी यांच्या आदेशाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दबाव टाकून कंत्राटदारांकडून ही कामे करून घेतली. सदर कामाच्या निधी बाबत विचारणा केली असता आम्ही डिमांड पाठवलेली आहे ,बस एवढा बोलून वेळ मारून न्यायचे काम संबंधित विभागाचे अधिकारी करत आहे. जवळपास नगर विकास विभागाचे 400 कोटी ग्रामविकास विभागाचे 500 कोटी सामाजिक न्याय विभागाचे 100 कोटी तसेच इतर विभागाचे सुद्धा 200 कोटीच्या जवळपास देयके थकीत आहे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती अंतर्गत येणाऱ्या विभागांच्या अधिकाऱ्यांनी निधी मिळण्याकरिता कुठली पावले उचलली याबाबत जबाब दो आंदोलन प्रत्येक कार्यकारी अभियंता यांच्या दालण्यात करण्यात आले आहे. येत आहे. जवाब दो आंदोलनाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती येथील कार्यकारी अभियंता माननीय श्री प्रतिक गिरी साहेब यांच्या दालनात आज करण्यात आले असून संघटनेच्या बैठकीप्रमाणे प्रत्येक सोमवारी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी विशेष प्रकल्प विभाग अमरावती येथील कार्यकारी अभियंता श्री पिंजरकर साहेब यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात येणार आहे.त्यानंतर दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर येथील कार्यकारी अभियंता श्री वानखडे साहेब यांच्या दालनात आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच पुढील आंदोलन दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी विशेष प्रकल्प विभाग नंबर 2 दर्यापूर येथील कार्यकारी अभियंता श्री अडसुळे साहेब यांच्या दालनात करण्यात येणार आहे.संबंधित विभागात काम करणारे कंत्राटदार त्या त्या विभागाच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. संघटना प्रलंबित निधी मिळण्याकरता शक्यते प्रयत्न करत आहे.
