नेर परसोपंत /वसीम मिर्झा
कानपूर येथे काही तरुणांनी आय लव मोहम्मद असे फलक लावले होते. या प्रकरणी तब्बल २५ तरुणांवर गुन्हा दाखल करून एफ.आय.आर. करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात सामाजिक कार्यकर्ता शोएब खान यांच्या नेतृत्वात सकल मुस्लिम समाज, नेरपरसोपंत यांच्या वतीने तहसीलदार नेर यांचा मारेफत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, “धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. तरुणांनी आय लव मोहम्मद ’ असा फलक लावला होता, त्यातून कोणतेही सांप्रदायिक वातावरण बिघडलेले नाही. तरीदेखील पोलिस प्रशासनाने २५ निरपराध तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे, ही कारवाई अन्यायकारक असून तात्काळ मागे घेण्यात यावी.”या प्रकरणी तातडीने योग्य ती दखल घेऊन गुन्हे मागे घेतले नाहीत, तर संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदनावर शोएब अबरार खान यांच्यासह अनसार शाह, बासीत खान, राही साहब, शहेबाज़ अहेमद, रियाज़ टिक्की, साजीद खान, शउर खान, शोज़ब पठान, इकराम खान, तनवीर खान, अरबाज़ शेख, अ नदीम, सै नदीम, अमीर खान, गोलु राज, रेहान पटेल, अज़हर खान, शोएब खान, मो अवेस, मो अनीक व अनेक समाजबांधवांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत…
