
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
कल्पना शरद वानखडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त नुकताच सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. स्नेहल शेलार गटविकास अधिकारी व्यासपीठावर विराजमान होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद संकपाळ गटशिक्षणाधिकारी, विलास बाबरे विस्तार अधिकारी शिक्षण, पंडित पंडागडे, डॉ.स्वप्नील मालखेड, केंद्रप्रमुख विलास राठोड, प्रविण मेहरे, अनिल कोल्हे, बाळासाहेब मुंदे, अविनाश अढाव, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि मांजरी म्हसला. ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यासपीठावर विराजमान होते.
या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपिका अर्बाळ यांनी केले.आपल्या प्रास्ताविकामधे सुरज मंडे यांनी कल्पना वानखेडे यांचे शिक्षण, सेवा, शीस्त व कर्तव्यविषयी इत्यंभूत माहिती दिली.निरोप समारंभ निमीत्त केंद्राचे वतीने शरदराव आणि कल्पना वानखेडे यांना स्मृतिचिन्ह, पैठणी, शाल आणि ट्राव्हलिंग बॅग व ड्रेस केंद्राचे वतीने प्रदान करण्यात आले. तसेच सेख , ज्ञानेश्वर, शाळा व्यवस्थापण समिती आणि ग्रामपंचायत तसेच मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सेवानिवृत्ती निमित्त मॅडमला विविध भेटवस्तू दिल्या.डॉ.स्नेहल शेलार यांनी आपल्या मनोगतामध्ये कल्पना वानखेडे यांनी मूळ पदाव्यतिरिक्त सांभाळलेल्या गटशिक्षणाधिकारी आणि अधीक्षक शालेय पोषण आहार ही अतिरिक्त पदे सक्षमपणे सांभाळून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय दिल्याचे प्रतिपादन केले. प.स.नांदगावचे गटशिक्षणाधिकारी पद सांभाळून तालुक्यात चांगली प्रशासकीय घडी बसविली असे प्रतिपादन गटशिक्षणाधधिकारी प्रसाद संपकाळ यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी पंडित पंडागडे, विलास बाबरे, अनिल कोल्हे, मालखेड साहेब, अविनाश अढाव, संजय नवारे आणि केंद्रातील शिक्षकांनी वानखेडे मॅडम यांच्या उत्कृष्ट कार्य बद्दल गुणगान केले.सेवापूर्ती समारंभाला उत्तर देताना वानखेडे मॅडम भावूक झाल्या होत्या. संयुक्त कुटुंब सांभाळून नोकरी करतांना आपल्या आयुष्यातील चढउतार त्यांनी कथन केले. वेगवेगळे प्रभार सांभाळताना विविध प्रसंगी सहकार्य करणाऱ्याचे धन्यवाद त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला शा.व्य समिती अध्यक्ष मांजरी म्ह. सखूबाई मदन चव्हान, उपाध्यक्ष किरन गारोडे, कविता चव्हान, अनिता धर्मपाल भलाश, शुभांगी अजय साकुरे, हेमलता सचिन गोमासे, उपसरपंच बबीता गारोडे, मधुसूदन काळमेघ, मनोज भांदर्गे, अनिल देशमुख, सुरज मंडे, रवी गजभिये, राजाभाऊ देशमुख, संजय नेवारे, गजानन वाके, प्रियंका राणे, हेमलता भिमटे, दीपिका अर्बाळ, संगिता बदुकले, मंगला चवरे, रेखा बोकडे, उज्वला भडांगे, प्रेरणा पेठे, पवन मसराम, जितेंद्र यावले, प्रशांत सापाने, किशोर गणवीर, पवन मसराम, अनिल वरणकर, शिवहरी मुगल, योगिता पिंजरकर, जयश्री भोपळे, श्रद्धा सार्वे, ज्योती जगताप, अर्चना कवाने, स्वाती पोकळे, सुवर्ना घाटेकर, हर्षमाला मासोदकर, अनघा भोपळे, परमानंद वैष्णव, हर्षद पंडित, गजानन होळकर, धनाजी चव्हाण, यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.