मृदा व जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाच्या चुकी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा ते पळसखेड ग्रामीण नंबर 19 असलेल्या रस्त्यावरील कडू नाल्यातील रस्ता पूर्णतः वाहून गेला असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे रखडली आहेत.एक महिन्या पासून सर्व शेतकरी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रस्त्या करीता निवेदना द्वारे मागणी करत आहे.परंतु प्रशासनाने अजुन कोणतेही पाऊल उचलले नसल्याने.शेतकऱ्यांना नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.सविस्तर वृत्त असे की दहीगाव रेचा ते पळसखेड पांदन रस्त्या वरील कडू नाल्यात मृदा व जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला कडू नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. रस्त्याच्या लगतच खोली करण केले तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे रहदारीचा मुख्य रस्ता हा नाल्याला आलेल्या पुरा मुळे दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी वाहून गेला.शेतकऱ्यांना शेतात जाण्या करीता खोल दरी पडल्याने शेतातील सर्व कामे बंद पडली गेल्या एक महिन्यापासून शेती करीता खत, फवारे,एकंदरीत शेतीचा पूर्ण उदिम बंद झाला असुन. संत्रा , केळी, पपई या सारख्या नगदी पिकांचे रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्ता नसल्याने व्यापारी वर्ग शेतकऱ्यांच्या शेती कडे जाऊ शकत नाही त्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तर शेतातील गायी म्हशी बैल शेळ्या यांना चारा पाणी करण्या करीता स्वतःचा जीव मुठीत घेऊन नाला पार करावा लागत आहे.या सर्व नुकसानी करीता मृदा व जलसंधारण लघु पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून तहसील कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मृदा व जलसंधारण लघु पाटबंधारे विभाग, या सर्व संबंधित प्रशासनाला शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन व विशेष ग्राम सभेवर घेतलेला ठराव दिला परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने दिनांक 24 सप्टेंबर 2025 बुधवारी रोजी सकाळी 10 वाजता पासुन शेतकरी बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत.
