अनेक वर्षा पासून विकासापासून दूर असलेल्या कॉलन्या शेवटी लोकांच्या एकजुटी मुळे हद्दवाढ ठराव ग्रामसभेत मंजूर झाला
धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
जुना धामणगाव ग्रामपंचायत हद्दी मधील 65कॉलन्या नगरपरिषद मध्ये समाविष्ट करण्याबद्दल 2021 मधे पत्र नगरपरिषदने ग्रामपंचात ला दिले होते परंतु त्या वेळेस ग्रामपंचायत संपूर्ण नगरपरिषद मधे घ्यावी असा ठराव पारीत करण्यात आला होता.

तोच विषय आज सुद्धा काही राजकीय लोकांनी आपली राजकीय पोळी भाजन्यासाठी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होते परंतु ऋषीं जगताप यांनी नागरिकांच्या व सचिवाच्या लक्षात आणून दिले कि गावालगतच्या 65 कॉलण्या सर्वे नंबर नुसार व कॉलनीच्या नावा सोबत हद्द वाढीसाठी देण्यात येत आहे असे ठरावा मधे स्पष्ट लिखित असे नमूद करा व म्हणून आज नागरिकांच्या उपस्थिती मध्ये ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. ऋषीं जगताप यांनी अनेक वर्षांपासून हद्द वाढसंदर्भात पाठपुरावा केला व आज सुद्धा त्यानी होत असलेल्या त्रासाला लक्षात घेता लोकांनचा आवाज उठवला नागरिकांच्या मागणीला शेवटी आज यश मिळाले त्या बद्दल सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
