
तीन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
दि. १७ जुलै २०२५ रोजी चांदूर रेल्वे पोलिसांनी धामणगाव रेल्वे रोडवरील चर्चच्या मागे जुगार खेळणाऱ्यांविरोधात कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खाजगी वाहनातून घटनास्थळी छापा टाकला असता काही इसम एक्का बादशाह नावाचा हार-जीतचा जुगार खेळताना आढळले. पंचांच्या उपस्थितीत कारवाई करत पोलिसांनी तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम २,९७० रुपये, अंदाजे ३०,००० रुपये किंमतीचे तीन अँड्रॉइड मोबाईल, तसेच दोन दुचाकी — बजाज पल्सर (एमएच ३१ सीवाय ९०२८, किंमत ₹७५,०००) आणि हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच २७ एयू २४६४, किंमत ₹४५,०००) असा एकूण ₹१,५२,९७०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.१) मनिष रतनलाल उपाध्याय (वय ४०, रा. वकील लाईन, चांदूर रेल्वे),२) संतोष शिवनाथ केशरवानी (वय ३६, रा. आठवडी बाजार, चांदूर रेल्वे), ३) प्रफुल्ल राजू वासनिक (वय ३६, रा. शिक्षक कॉलनी, चांदूर रेल्वे) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोलीस निरीक्षक अजय आकरे, उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट, अंमलदार शिवाजी घुगे, प्रवीण मेश्राम, राहुल इंगळे, प्रशांत ढोके व संदीप वासनिक यांचा सहभाग होता.