मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांचा समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती, जिल्हा परिषद पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेवर आगामी काळात काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे, याकरिता आपणाला उमेदवारीचे सर्व अधिकारी देतो, अशी घोषणा करीत केवळ संविधानाकरिता लढणाऱ्यांनाच उमेवारी द्या, नातेवाईकांची उमेदवारी टाळा असा सल्ला कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कायकर्ता मेळाव्या प्रसंगी दिला.

काँगे्रसभवन येथे बुधवारी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर खासदार बळवंत, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजीमंत्री यशोमती ठाकुर, माजीमंत्री सुनिल देशमुख, वीरेंद्र जगताप, बबलू शेखावत, राजकुमार पटेल, विलास इंगोले, हरीभाऊ मोहोड, रोहित पटेल, किशोर बोरकर, पंकज मोरे,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष नांदगाव (खंडे.) दिपक संजयराव भगत,मंगेश जोगे, मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, प्रविण मनोहर आदींची उपस्थिती होती. शासनावर टिका करीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले, आपली लढाई ही वैयक्तीक नसून संविधान वाचविण्याची लढाई आहे, मावनता ठिकवुन आणि आदीवासींना वाचविण्याची लढाई आहे. कारण शासनाकडून आदींवासी बांधवांना वनवासी संबोधित या जमातीला वेगळे ठेवण्याचा डाव रचला आहे. तो ठाव आता हाणून पाडायचा असेल तर पुन्हा एक एकसंघ होऊन मतांची लढाई लढावावी लागेल, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.सत्तेकरिता लढण्यापेक्षा संविधान वाचविण्याकरिता लढवु या, अशाच विचारांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी द्या,जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नावाचा उल्लेख करीत राज्याचे सर्व अधिकार आपणाला सोपवितो, परंतु जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरालिका आणि महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवा असे आवाहन देखील यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना केले. या बैठकीला जिल्हा कार्यकारीणीसह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या नावाखाली देशात व राज्यात समाजा समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहे.तोडो, फोटो आणि राज करो अशी या सरकारी रणनिती आहे.अशीच परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहेख़ऱ्या अर्थाने देशातील सर्वच आरक्षण या सरकारला संपवायचे आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

माजी आमदार राजकुमार पटेलसह पुत्राचाही काँग्रेसमध्ये प्रवेश
माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचे सुपुत्र धारणी बाजार समितीचे सभापती रोहीत पटेल यांचेसह मेळघाटातील शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्या काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे स्वागत करीत सत्कार केला.
माजी आमदार राजकुमार पटेल यांनी यापुर्वी प्रहारच्या उमेदवारीवर आमदारकी मिळविली होती. त्यापुर्वी ते भाजपा, राष्ट्रवादी, बसपा आदी पक्षामध्ये देखील होते. निवडणुकीनंतर राजकुमार पटेल शिंदे शिवसेनामध्ये प्रवेश करणार अशाही वार्ता पसरल्या. तीनदा आमदार राहीलेले राजकुमार पटेल यांनी अखेर बुधवारी मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या सोबत मेळघाटाील ६० पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांचाही प्रवेश यावेळी करण्यात आला. यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक, बाजार समितीचे विद्देमान संचालकांचाही समावेश आहे.
येथे शेतकरी संकटात असताना पंतप्रधान आपला वाढदिवस साजरा करताऐत, पालकमंत्र्यांचे देखील जिल्ह्यावर लक्ष नाही. हे शासन आपल्या सर्वसामान्यांचे नाही, त्यामुळे आता त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे.
माजीमंत्री यशोमती ठाकुर,
कॉग्रेसच्या कोणत्याही सक्रिय कार्यकर्त्यावर निवडणुकीमध्ये अन्याय होणार नाही. कारण यावेळी देखील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांवर काँगेसचाच झेंडा कायम ठेवायचा आहे.त्यामुळे प्रत्येकांनी काँग्रेचाच विचार घेवून कामाला लागा.
बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष,
