मुख्यालयी राहण्याच्या धास्तीने नवीन निवासस्थानाची मागणीच नाही.
जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय.?
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या अगदी समोरील बाजूला तहसीलदार आणि नायब तहसिलदार यांची अत्यंत छोटेखानी निवासस्थाने आहेत शहरात तहसील कार्यालयाची अत्यंत देखणी आणि प्रशस्त इमारत डौलात उभी झाली आहे परंतु तहसीदारांसह नायब तहसिलदार यांची निवासस्थान ही अत्यंत जुनी म्हणजे सन १९८१ पासुंनची असल्याने ती सध्या जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे,झुडपे लागली.

असून हा एक प्रकारचा भूत बंगलाच जाणवत आहे रात्रीला येथील परिस्थिती भयानक राहते या ठिकाणी तहसीलदार आणि नायब तहसिलदार यापैकी कुणीही निवास करीत नाही ते दररोज अपडाऊन करतात आणि मजेशीर बाब म्हणजे या निवासस्थानाच्या जागेवर नवीन निवासस्थान बंधण्याबाबत गेल्या दहा वर्षांत कोणत्याही तहसीलदाराने आपल्या वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत कोणताही पत्र व्यवहार पण केलेला नाही याला मुख्य कारण असे की येथे जर तहसीलदार आणि नायब तहसिलदार यांचे प्रसस्थ असे निवासस्थान झाले तर त्यांना दररोज अपडाउन करायला मिळणार नसून त्यांना या निवासस्थानी राहणे सक्तीचे होईल आणि या ठीनी नवीन तहसील कार्यालतची इमारत झाली पण अधिकाऱ्यांची निवासस्थाने झाली की नाही हे कोणत्याही आढावा बैठकित कोणत्याही लोकप्रतिनिधींनी विचारले सुद्धा नाही त्यामुळे हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आता दररोज अप डाउन करायला मोकळे झाले आहेत कुणी तक्रार केली तर हेच अधिकारी नांदगाव शहरात तहसील कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना निवासस्थाने नाहीत असे सांगायला मोकळे त्यामुळे व्वा.रे प्रशासन असे म्हणण्याची वेळ जनतेवर आलेली आहे.

तहसीलदारांसह सर्वच कर्मचारी करतात दररोज अपडाउन
या तहसील कार्यालया मधील एक तहसीलदार,चार नायब तहसिलदार आणि सुमारे पन्नास कर्मचारी यांच्यापैकी कुणीही नांदगाव खंडेश्वर येथे मुख्यालयी राहत नाहीत रात्रीच्या वेळी या तालुक्यात जर एखादी अनुचित घटना घडली तर त्या ठिकाणी तालुक्याचा प्रमुख अधिकारी म्हणून कुणीही हजर राहत नाहीत अश्या वेळी हे अधिकारी सरळ त्या गावातील आणि भागातील मंडळ अधिकारी किवा पोलीस पाटील यांना सांगून मोकळे होताना दिसतात इतकी भीषण परिस्थिती या तालुक्याची झालेली आहे. तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी दररोज अपडाउन करीत असल्याचा फायदा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पण घेतलेला असून ते पण मस्तपैकी अपडाऊन करताना दिसतात त्यामुळे नागरिकांना या कार्यालयातील सर्व टेबल बहुतांश वेळी खालीच दिसून येतात.

या कारणाने नागरिकांना बऱ्याच वेळी आल्या पावली परत जावे लागते प्रमुख अधिकारीच जर अप डाउन करत असतील तर त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा काय अधिकार आहे ? त्यामुळे येथील तहसील कार्यालयात चागलेच ऑलवेलं असल्याचे दिसून येते तहसीलदार पण आठवड्यातून काही दिवस कार्यालयात येतात तर काही दिवस दांड्या मारतात आणि आले तरी लवकरच निघून जातात कीवा उशिरा येतात त्यामुळे जनतेची कामे होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत पण याकडे लक्ष द्यायला या विभागाच्या आमदारांना वेळच नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे जनतेने तक्रारी कराव्या तरी कुठे.त्यांचा वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
