
कुऱ्हाडीने केले होते वार उपचारादरम्यान मृत्यू तेल्हारा तालुका हादरवणारी घडली होती घटना.
तेल्हारा / संदीप सोळंके
तेल्हारा पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी विनोद तेलगोटे याने शेतीच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांना कुऱ्हाडीचे वार करून गंभीर जखमी करून घरातून निघून गेला असता. उपचारादरम्यान जखमी आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संबंधित घटना तारखेपासून आरोपी हा फरार झाला. त्याने स्वतःजवळ कोणताही मोबाईल किंवा आधार कार्ड बाळगले नव्हते.तरीसुद्धा तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात शोध पथक पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील भटकर यांनी सूचना दिल्या असता तत्परता दाखवत हेट कॉन्स्टेबल राहुल तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मनोज कासले हे आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे येथे रवाना झाले.आरोपी हा शातिर होता.तो नेहमी आपले ठिकाण बदलत असायचा त्यामुळे पोलीस प्रशासनाला आरोपीस पकडण्यास अपयश आले मात्र. पोलीस प्रशासनाने हार न मानता अखेर आरोपीस पकडण्यात यश आले.पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे ,पोलीस कॉन्स्टेबल मनोज कासले यांनी आरोपीस सीताफिने ग्राम वाळकी जिल्हा अहिल्यानगर येथील एका चायनीज सेंटर वरून आरोपीला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून संबंधित घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शुभम मालोकार हे करीत आहेत.