
पोलीस अधिक्षक याच्या आदेशावरून झाली कार्यवाही
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हयात होणा-या मालमत्तेचे गुन्हयांबाबत तात्काळ दखल घेवून गुन्हे तत्काळ उघडकीस आणण्याबाबत जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांना सुचना दिल्या आहेत.त्यानुसारपोलीस स्टेशन शिरजगाव कसबा येथे दिनांक ०४.०७.२०२५ रोजी अपराध क्रमांक २६७/२०२५ कलम ३०९ (४) भारतीय न्याय सहीता प्रमाणे तक्रारदार मंगेश भाऊराव सोलव वय ४४ व्यवसाय अॅटोचालक रा.कु-हा ता. चांदुरबाजार जि. अमरावती यांचे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीमध्ये नमुद केले होते कि, त्यांचेकडेस एम.एच.४९ ई १२४५ या क्रमांकाचा बजाज रियल कंपनीचा अॅटो असून तो अॅटो ते कु-हा ते परतवाडा असा चालवित असतात. दिनांक ०३.०७.२०२५ रोजी सकाळी ०८.३० वाजताचे दरम्यन ते कु-हा येवून त्यांचा अॅटो घेवून परतवाडा येथे गेले होते. त्यांचा भाचा शुभम सगने रा. मिला कॉलनी यांचेकडून त्यांनी उधारीचे २०,००० रुपये घेवून दिवसभर काम करून २०.३० वाजताचे दरम्यान कु-हा गावाकडे निघाले असता त्यांना वाटेत गुजरीबाजार परतवाडा येथून त्यांना लिन सवा या (दोन खरपी येथील व एक करजगाव येथील) भेटल्या होत्या. आरोपीने त्यांना करजगाव येथे उतरणार आहे अशी माहीती दिली होती. खरपी येथील सवा-या उतरवून दिल्यानंतर नमुद तक्रारदार हे खरपी टि पॉईट कडे जात असतांना यातील आरोपीने त्यांचेशी गोष्टी करून त्यांना माहीती विचारले व गोष्टीगोष्टीमध्ये त्याचे नाव अनिकेत असल्याचे सांगीतले.खरपी टि पॉईट पासून १०० मिटर अंतर गेल्यानंतर यातील आरोपीने फिर्यादीला मला लघवी आली आहे असे सांगून अॅटो थांबविण्यास सांगीतला, अॅटो थांबल्यानंतर यातील आरोपीने खाली उतरून नमुद फिर्यादी याला चाकूचा धाक दाखवून त्यांना खिश्यात काय आहे हे विचारून त्यांचे पेंटचे खिश्यातील २०,०००/रुपये जबरीने काढून घेवून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला होता.सदरचे गुन्हयातील आरोपी हा अनोळखी असल्याने व त्याने फक्त त्याचे नाव अनिकेत सांगीतल्याने तक्रारदार यांनी सांगीतलेप्रमाणे नमुद आरोपीचा पोलीस स्टेशनचे हददीत शोध घेण्यात आला असता गोपनिय माहीती मिळाली कि, खरपी येथील अनिकेत नावाचा ईसम हा गावातून पळून गेला आहे. त्याचे बाबत गोपनिय माहीती घेतली असता तो बडनेरा येथे असल्याची माहीती मिळाल्याने नमुद आरोपीला ताब्यात घेवून त्याला सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची माहीती दिल्याने नमुद आरोपीकडून गुन्हयातील गेली रक्कम १२,०००/रोख, धाक दाखविण्यासाठी वापरलेला चाकू, कडे हे जप्त करण्यात आले आहे.सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री. विशाल आनंद, मा.अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री. पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग अचलपूर- डॉ. शुभम कुमार, पोलीस निरीक्षक स्थागुशा किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात सपोनि महेंद्र गवई, पोलीस उपनिरीक्षक-प्रशांत जाधव, सतिश पुनसे, पोलीस अंमलदार अमोल कपले, मिलींद इंगोले, भारत कोहळे, नंदाराम पटोकार, वैभव मांडवगणे, अभय हरदे, अनुप टिंगणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सागर धापड यांनी केली आहे.