
अमरावती शहर डीबी पथकाची यशस्वी कारवाई
बडनेरा / प्रतिनिधी
बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डीबी (गुन्हे प्रकटीकरण) पथकाने केलेल्या तत्पर व प्रभावी तपासामुळे एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.
फिर्यादी प्रणव वसंतराव शिंदे (वय 37, रा. साई हेरीटेज, साई नगर, अमरावती) हे दि. 17 जुलै 2024 रोजी चमन नगर ते अकोली रिंग रोड ने जात असताना काही अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.त्यांनी फिर्यादीस तोंडावर थपड व बुक्यांनी मारहाण करून, त्यांच्याजवळील Vivo कंपनीचा ₹12,000/- किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या प्रकाराची तक्रार बडनेरा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून,याप्रकरणी अप.क्र. 442/2024, कलम 309(6), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासादरम्यान,व पोनि श्री. सुनील चव्हाण यांच्या आदेशाने डीबी पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी मंयुन महेंद्र पंडित (वय 21, रा. खोलापुरी गेट, भातकुली रोड,अमरावती) यास ताब्यात घेतले.चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्याचा साथीदार अंनता उर्फ आनंद जयदेव सिरसाठ (वय 38, व्यवसाय: मंडप डेकोरेशन, रा. खोलापुरी गेट, अमरावती) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता,फिर्यादीकडून जबरदस्तीने हिसकावलेला Vivo मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. यानंतर पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणत तपासात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.
पोलीस आयुक्त श्री.अरविंद चावरिया,पोलीस उपायुक्त (परिमंडळ – 1) श्री. गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. कैलाश पुंडकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण,पोनि प्रफुल गीते,पोउपनि सचिन माकोडे (डीबी पथक इंचार्ज),पोहेकॉ सुधीर प्रांजळे,पोहेकॉ रोशन निसग,नापोकों शशिकांत शेळके,
पोकों धनराज ठाकूर, मोहम्मद समीर व शुभम कडुकार यांचा समावेश होता.
शहरात अशा घटना टाळण्यासाठी सतर्क राहावे व संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलीसांना माहिती द्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे.