शारीरिक, बौद्धिक, डिजिटल सायबर,वाहतूक सुरक्षेबाबत विद्यार्थ्यीनींशी साधला संवाद
नेर परसोपंत/वसीम मिर्झा
स्थानिक जिजामाता कन्या विद्यालय नेर येथे शारदोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अनिल बेहराणी ठाणेदार नेर यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने संवाद साधत शारीरिक,बौद्धिक,डिजिटल सायबर,वाहतूक सुरक्षा आणि आधुनिक शस्त्रांची प्रात्यक्षिके देत कायदेशीर माहिती देऊन विध्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचे महत्त्वपुर्ण मार्गदर्शन केलेआजच्या डिजिटल युगात वावरत असताना विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करत असताना सायबर सुरक्षेचे महत्त्व व धोके यासंदर्भात विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले इंटरनेटचा सुरक्षित वापर, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी तसेच मानसिक व बौद्धिक सुरक्षिततेचे भान विद्यार्थ्यांना पटवून दिले याशिवाय भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देत परिश्रम, शिस्त आणि चिकाटीमुळे आपल्याला यशोशिखरावर कसे पोहोचता येते हे सुद्धा त्यांनी पटवून दिले कार्यक्रमात विद्यार्थिनींना विविध शस्त्रांची सविस्तर माहिती देत शस्त्रांचा उपयोग, त्यांचे प्रकार आणि त्यांचा कायदेशीर संदर्भ याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवून समजावून सांगीतले तसेच पोलीस हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून त्रास अथवा अडचण आल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थीनींना केले या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यीनींचा पोलीस प्रशासनाबाबतचा न्युनगंड आणि गैरसमज दूर होऊन आत्मरक्षण , सुरक्षा कायदेविषयक सविस्तर माहिती मिळाली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका दीपा फाटे,प्रमुख अतिथी लता सिरसाट तर शिक्षक वैभव जगताप,शेखर जाधव,अमजद मिर्झा,वर्षा कोरडे,सोनल दांडगे, कल्पना उके, निकिता खोब्रागडे,गौरी काजगे, मयुरी गुल्हाने उपस्थित होते शिक्षकेतर कर्मचारी आशिष धोटे, सुभाष बगमारे,सुनीता राऊत, दीपा महिंद्रकर यांचे योगदान लाभले.
