
इंडो पब्लिक स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
अमरावती/ सचिन ढोके
अमरावती दरवर्षी २१ जून रोजी, योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.औचित साधून स्थानिक इंडो पब्लिक स्कूल मध्ये योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेतील योग शिक्षक यांनी शाळेतील मुलांना, शिक्षकांना व कर्मचारी वृंदाना योगासनाचे महत्त्व पटवून देऊन प्रात्यक्षिके करून दाखविले. त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा योगासने केली. जीवन जगण्याकरिता किंवा शारीरिक बळ व मानसिक संतुलन टिकवण्याकरिता योग किती महत्त्वपूर्ण ठरू शकतो याची जाणीव मुलांना व शिक्षकांना योग करताना आली. सूर्यनमस्कार, ताडासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वृक्षासन, अश्या प्रकारची अनेक आसने शिक्षकांनी केली. योग ही एक मन आणि शरीराद्वारे केला जाणारा सराव आहे जी हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारतात उगम पावली. त्यात अनेक शारीरिक आसने (आसन), श्वास घेण्याच्या पद्धती (प्राणायाम), ध्यान यांचा समावेश आहे . योगाचाचा उद्देश एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्पष्टता, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक कल्याण सुधारणे आहे. ‘योग’ हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र येणे, शरीर आणि जागरूकता यांचे एकीकरण दर्शवणे असा होतो. याप्रसंगी शाळेच्या संचालिका सौ डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख, प्राचार्य विजया बागडदेव मॅडम, उपप्रचार्य योगेश ठाकरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. अश्याप्रकारे योगदिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
👌👍