विना परवाना, खाजगी व्हॉन व अॉटोरिक्शा मधून विद्यार्थ्यांचा प्रवास
आरटीओ, पोलीस प्रशासन, शिक्षण प्रशासनाचे दुर्लक्ष
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी शहरात ,अनेक ठिकाणी ,मोठमोठे खाजगी कॉन्व्हेंट ,विद्यालय, व खाजगी शाळांचा सुळसुळाट झाला असून या शाळेत येणारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विना परवाना व कागदपत्र नसलेल्या खाजगी मॅजिक व्हॉन व ऑटो रिक्षा मधुन वाहतुक चालत असल्याने, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचं दिसून येत आहे.कोणत्याही स्कूल बसला परवाना नसताना विद्यार्थ्यांना घेऊन रोज मॅजिक व्हॅन मध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 35 ते 40 विद्यार्थी कोंबून विद्यार्थी बसून जीवघेणा प्रवास करत आहे. विद्यार्थ्यांना श्वास सुद्धा घेता येत नाही, अशी परिस्थिती, या वाहनाची दिसून येते ,काही ऑटो रिक्षाला परवानगी नसताना ही खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणे – जाणे हे ऑटो करत आहेत ,पालक सुद्धा महिन्या काठी पैसे या वाहनधारकांना देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाची परवा न करता, या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जाते ,अंजनगावातील, नामवंत कॉन्व्हेंट ,हास्कूल ,शाळाचे संचालक व मुख्याध्यापक या स्कूलबस चालकांना कोणतेही आरटीओ प्रमाणित कागदपत्राची माहिती न विचारता शाळा कॉलेज वैयक्तिक स्वार्थासाठी अशा वाहनांना आपल्या शाळेत विद्यार्थी घेऊन येण्यास सांगत असल्याचे विश्वासनीय सुत्रांनी सांगितले. अश्या वाहनात विद्यार्थीना बसविताना विचित्र प्रकार स्कूलबस मध्ये सुध्दा बसविताना ,दिसून येतात. अंजनगाव दर्यापूर रोड , अकोट परतवाडा मार्गावर ह्या सर्व शाळा कॉमेंट असून तालुक्यातील ,धनेगाव, टाकरखेडा, बोराळा, कापूसतळणी,चिंचोली बु, पांढरी ,पथ्रोट , शिंदी बु ,कारला, सातेगाव, तुरखेड ,निमखेड बाजार लखाड,मलकापुर ,शिरगाव,हंसनापुर , हिंगणी, गावंडगाव, मुऱ्हा, देवी,खिराळा, चिचोना अशा या विनापरवाना मॅजिक वाहनांमध्ये ऑटोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जात आहे. जर एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना जीवास मुकावे लागणार आहे, मात्र या कडे शिक्षण अधिकाऱ्यांचे स्थानिक अश्या कॉन्व्हेंट खाजगी हायस्कूल वर लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांचे जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक वाहतूक पोलीस या वाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, अमरावती आरटीओ यांनी योग्य दखल घेऊन अशा बोगस विनापरवाना इन्शुरन्स संपलेल्या व लायसन नसलेल्या सर्व स्कूल बस, मॅजिक अॉटोरिक्शा विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अवैध वाहनावर कारवाईची मागणी सामान्य नागरिका कडून होत आहे.अंजनगाव पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांनी अश्या अवैध वाहनावर, शाळेकडून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
