
चांदूर रेल्वे पोलिसांनी जप्त केला मुद्देमाल
चांदुर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदुर रेल्वे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अवैध इंग्लिश दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर मोठी कारवाई केली असून त्याच्याकडून एकूण ७९,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासह संताबाई यादव नगर चौक, चांदुर रेल्वे येथे सापळा लावला. यावेळी एक मोसा होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी (क्रमांक MH-27 DR-4320) चालवत ठाकरे चौक, चांदुर रेल्वे रोडकडून संताबाई यादव नगर चौकाच्या दिशेने येताना आढळून आला. त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव विनोद नारायणराव बन्सोड (वय ४७, व्यवसाय – मजुरी, रा. राजुरा, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) असे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यात खालील प्रमाणे अवैध इंग्लिश दारू आढळून आली त्यामध्ये १५ नग रॉयल स्टँग कंपनीच्या १८० एमएलच्या बाटल्या, प्रत्येकी किंमत ₹२२० – एकूण किंमत ₹३,३००
१६ नग ऑफिसर चॉईस कंपनीच्या ९० एमएलच्या बाटल्या आढळून आल्या आहेत त्याची प्रत्येकी किंमत ₹८५ – एकूण किंमत ₹१,३६० रुपये असून याशिवाय होंडा शाईन दुचाकी (MH-27 DR-4320), अंदाजे किंमत ₹७५,००० असा एकूण ₹७९,६६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपी विनोद बन्सोड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मा. अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार (चांदुर रेल्वे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे, सपोनि रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार राहुल इंगळे,संदीप वासनिक, व गजानन वाघमारे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.