येवती येथे ह भ प बाल किर्तनकार महाराज पाथरे यांचे प्रतिपादन
नांदगाव खंडेश्वर/पवन ठाकरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथे 55 वर्षी पासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सुरू आहे.श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्री राम मंदिर संस्थान येवती येथे अनेक धार्मिक कार्यक्रम रेलचेल सुरू आहे,सकाळी काकाडा दुपारी श्रीमद रामायण कथा ह भ प आसटकर गुरुजी यांच्या सुमधुर वाणितुन कथा गावातील नागरिक व भक्तगन श्रवण करत आहेत,सायंकाळी हरीपाठ आरती व हरीकिर्तन यां कार्यक्रम रोज नित्यनेमाने सुरू आहेत पहिल्या दिवशी किर्तन सेवा ह भ प ओम महाराज पाथरे यांचे किर्तन दुसऱ्या दिवशी ह भ प विशाल महाराज बढे तिसऱ्या दिवशी ह भ प किशोर महाराज काळे चतुर्थ दिवशी ह भ प विष्णु महाराज सखारामपुर पाचव्या दिवशी ह भ प योगीणीताई वसंतकर सहाव्या दिवशी उमेश महाराज जाधव श्रीराम जन्मोत्सव किर्तन ह भ प धर्माचार्य दादा महाराज पाटील व काल्याचे हरिकीर्तन ह भ प दिनेश महाराज वक्ते यांचे होणार आहेत साथसंगत गायनाचार्य ह भ प विशाल महाराज बुळे गायनाचार्य ह भ प अशोक महाराज गारकर, मृदुंग वादक ह भ प रवीअण्णा महाराज धांडे आळंदी मृदंग वादक विठ्ठल महाराज गिराम सप्त्याहातील होणार आहे,असे विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहेत, पहिल्या दिवशी किर्तन सेवा ओम महाराज पाथरे यांनी आई वडिलांची सेवा हिच खरी भगवताची भक्ती आहेत आपले आई-वडील हे त्यागाचे मूर्तिमंत रूप आहेत. मुलांच्या सुखासाठी ते स्वतःचे आयुष्य वेचतात, त्यामुळे त्यांची सेवा करणे हे मुलांचे परम कर्तव्य आहे.ज्या घरात आई-वडिलांचा सन्मान होतो, तिथेच लक्ष्मी आणि देवाची कृपा असते. असे घर हे तीर्थक्षेत्रासारखे आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच खरी पूजा आहे. त्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची आराधना आहे, कारण आपल्या अस्तित्वाचे मूळ कारण तेच आहेत. असे प्रतिपादन बालकीर्तनकार ह भ प ओम महाराज पाथरे यांनी केले आहेत.
