जागतिक महिला दिनानिमित्त धनश्री प्रतिष्ठानचा उपक्रम
नवनियुक्त नगरसेवकांचाही सत्कार
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान वतीने समाज प्रबोधन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो.यावर्षी 15 मार्च 2026 रोजीसंस्थेचे कार्यालय असलेल्या गद्रे ले आऊट कलोती नगर अमरावती येथे साय.6 वाजता व्याख्यान व सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर संध्याताई टिकले उद्घाटक म्हणूनमनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक मंगेश मनोहरे, सुरेखा लूंगारे,डॉ मधुरा कहाळे, नंदाताई सावदे,24 वूमन्स चॅनल चे प्रीती साहू,साहित्यिक ॲड.स्मिता बुल प्रमुख वक्ता बाल व्याख्याता कू आराध्या ठाकरे ,प्रसिद्ध हास्य कवी मंगेश वानखडे, यांची उपस्थिती होती विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विदर्भातील पहिली दाल मिल महिला पूजा रडके, 35 वर्षापासून मेस चालवणाऱ्या अन्नपूर्णा दिपाली सगने, स्वतःची जिम असणाऱ्या प्रगती ठाकरे, साहित्यिक सोनवणे मॅडम यांचा शाल,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष मंजू ठाकरे , कुंदा पुसतकर ,सुचित्रा लहाने ,ऐश्वर्या मडगे, अपर्णा वाकोडे, स्वाती काळे, दिपाली पागृत, अबोली वानखडे, शारदा विधडे, अनिता भटकर, सविता पाटील, ज्योती हजारे, सुनिता सोलव ,कविता वाटाणे, सारिका देशमुख, विजया काळे, वैशाली शिर्के यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी वैद्य यादगिरे यांनी प्रासविक आरती बोंदरकर तर आभार प्रदर्शन स्नेहल राठोड यांनी केले.
