स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान पंधरवाडा
आरोग्य शिबिरात 100 जणांची आरोग्य तपासणी
धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव येथे भव्य महिला नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान दिन साजरा करण्यात आलात.हिंगणगाव येथील सरपंच सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी शिबिराची योग्य व्यवस्थापन केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, यांच्या मार्गदर्शनखाली गटविकास अधिकारी योगेश वानखडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल क्षीरसागर यांच्या नेतृत्वात डॉ.महेश लादे वैद्यकीय अधिकारी यांच्या नियोजनतुन महिलाची नि:शुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आलेत. रक्तदान दिनानिमित्त रक्तदात्यानी रक्तदान केले.प्रतीक ब्राह्मणकर,विस्तार अधिकारी,मोहन देशमुख,विजय ब्राह्मण, चेतन रोहनकर,सचिन तीतूरमारे यांनी रक्तदान केलेत.जिल्हातील रक्तसाठा व मेळघाटतील सिकलसेल ग्रस्त रुग्ण,मातामूत्यू, कुपोषण टाळण्यासाठी आरोग्य विभागातील बी.एम.सरदार यांनी रक्तदानचे महत्व पटवून दिले.तर हिंगणगाव येथील सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी रक्तदान ही केवळ एक सामाजिक बांधीलकी नसून जीवन वाचवण्याचे पवित्र कार्य आहेत असे यावेळी मार्गदर्शन केले. तर डॉ. सविता अप्पतुकर यांनी अपघात, शस्त्रक्रिया, गरोदरपणातील गुंतागुंत, गंभीर आजर अशा प्रसंगी रक्ताची गरज अनिवार्य असते.अशा भावना व्यक्त केल्यात, तर उपसरपंच संगीता धोटे यांनी सुद्धा रक्तदान जीवनदान वेळी रक्तदानामुळे माणुसकीची भावना दृढ होते आणि समाजात आपुलकी व एकोपा वाढतो, असे व्यक्त केले. महिलांची व गावातील नागरी कांनी आरोग्य शिबीरात 100 जणांनी तपासणीत केली.वैद्यकीय तज्ञ कडून उपस्थित डॉ. स्वप्निल बोरगे,नेत्रतज्ञ, डॉ. महेक अग्रवाल दंतरोग तज्ञ् महिला व नागरिकाच्या उपस्थित, तसेच विद्यार्थीचे शिबिरात तपासणी करून आरोग्य सल्ला देत औषध उपचार करण्यात आलात. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जनसंपर्क अधिकारी मिलींद तायडे, संगीता गायधणे, मंगेश उमक, प्रवीण कळसकर, डॉ. राहुल खराटे रक्त संक्रमण अधिकारी,आरोग्य पथकात यावेळी होते, तर उपसरपंच संगीता धोटे,उज्जला वानखेडे ग्रामपंचायत सदस्य, सचिन तसर, ग्रामपंचायत अधिकारी, गुंफा जाधव आरोग्य सह्यायिका, उषा भोयर आरोग्य सेविका,संगीता जुमडे अंगणवाडी सेविका, विमल बुराडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन तीतूरमारे, सुधाकर सपाटे यावेळी उपस्थित होते.
