नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदगाव खंडेश्वर अंतर्गत मौजे कोठोडा येथे येथे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ पंकज चेडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हवामान अनुकूल तंत्रज्ञान सोयाबीन पीक शेतीशाळा घेण्यात आली.शेतीशाळेमध्ये सोयाबीन पीक व्यवस्था याबद्दल सविस्तर अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी पि यू लाडके यांनी दिली.

सदर शेती शाळा प्रक्षेत्रावर वापरल्यागेलेल्या विविध उपायोजना व तंत्रज्ञान त्याद्वारे झालेली पिकाची वाढ हे प्रत्यक्ष शेतकरी यांना प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष दाखवण्यात आले. तसेच होस्ट फार्मर यांचे मनोगत घेण्यात आले तसेच सांघिक खेळ सुद्धा घेण्यात आला. अशाप्रकारे हवामान अनुकूल तंत्रज्ञान सोयाबीन पिकाची शेती शाळा कोठोडा येथे घेण्यात आली. सदर शेतीशाळेला तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ कृषी अधिकारी अजय साव , उप कृषी अधिकारी उदय गावंडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. शेती शाळेला गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.
