भव्य महाप्रसाद व सुंदरकांड पठणाने भक्तिमय वातावर
चांदुर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील हनुमान मंदिरात सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच कृष्णाजीसागर या तलावाजवळ ‘मोत्याचा मारुती’ म्हणून प्राचीन हनुमान मंदिर प्रसिद्ध असून येथे हनुमान जयंती वेळी धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.तसेच गावातील हनुमान मंदिर परिसरात दोन ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.या कार्यक्रमामुळे गावात एकात्मता आणि धार्मिक उत्साहाचे सुंदर दर्शन घडले.या वेळी निस्वार्थी सेवाभावी महिलांचा उत्फुर्त सहभाग दिसून आला. यावेळी लक्ष्मण राठोड, विशाल होले,रोशन चौधरी,राजेश लालसरे,विवेक मंगळे, किशोर कडू, विठ्ठल बोबडे,गजानन मंगळे,मनोज गोरडे,चेतन मंगळे, नाना नांदुरकर, गणेश खंगार, गजानन खंगार, विजय मेश्राम, राहुल सहारे, दीपक सहारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.

