तिवसा / रामचंद्र मुंदाने
महाराष्ट्रातील लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी व महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपण्यासाठी तसेच कलावंताना हक्काचे व्सासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता व नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा समजावून सांगण्याकरिता शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठान 2024 यांच्या विद्यमाने रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी मुंबई येथे येणाऱ्या 21 सप्टेंबर 2025 रोजी भव्य महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला आहे .या मेळाव्या संदर्भात चर्चा करण्याकरिता 8 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई येथील शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, कोयना रत्न, भजन सम्राट , राजाराम बुवा शेलार व सातारा जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे , अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने ,तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य शशीकांत गोळे , वाई तालुका अध्यक्ष डॉक्टर अमित शिंदे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष एडवोकेट पंजाबराव मोरे, व सप्तखंजेरी निर्माते सत्यपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरूदेव अध्यात्म गुरूकुल येथे विदर्भातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी 21 सप्टेंबर रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कलावंत मेळावा संदर्भात चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली .या सभेमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी 21 सप्टेंबर रोजी होणारा राज्यस्तरीय कलावंत मेळावा मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होऊन मोठ्या उत्साहाने यशस्वी करण्याचा निर्धार केला . या मेळाव्यामध्ये मध्ये आपापल्या सादरीकरणासाठी सर्वांनी जोरदार तयारी करून यावे म्हणजे हा कार्यक्रम आपली कला जगभरात घेऊन जाणार आहे . त्यानंतर सर्व मान्यवरांना या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका देण्यात आली . स्नेहभोजनाने या चर्चा सभेची सांगता करण्यात आली.यावेळी या सभेला अकोला जिल्हाध्यक्ष प्रबोधनकार ,सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज, उपाध्यक्ष डॉक्टर ऋषिपाल महाराज अनासाने ,राज्य कार्यकारिणी सदस्य व श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोझरी चे संचालक रवी दादा मानव , सप्त खंजरी वादक पवन महाराज दवंडे,सप्त खंजरी वादक संघपाल महाराज , सप्त खंजरी वादक वेदांतपाल मुंदाने , अनिल महाराज डवले , अहिल्यानगर अध्यक्ष रामनाथ नामदेव भोजने , अमरावती जिल्हाध्यक्ष संदीपपाल महाराज गीते ,अमरावती महिला ग्रामीण अध्यक्षा क्रांतीताई काळे , आदी कलावंत मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

https://t.me/s/Top_BestCasino/155