विद्यापीठात ‘डी-स्पेस वापरुन डिजिटल लायब्रारी तयार करणे’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
आजचे युग हे डिजिटल युग आहे. माहिती तंत्रज्ञानाने जगाला जवळ आणले. बदलत्या काळात ज्ञानाचे संकलन, जतन आणि प्रसार करण्यासाठी पारंपारिक पद्धती पलीकडे जावून डी-स्पेस सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्रंथपालांनी विविध सुविधा वाचकांना पुरवाव्यात,असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानरुाोत केंद्र आणि युजीसी – मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने ‘डी-स्पेस वापरुन डिजिटल लायब्रारी तयार करणे’ या विषयावर द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ परिसरातील ज्ञानरुाोत केंद्राच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले,

त्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, रिसोर्स पर्सन म्हणून उस्मानिया विद्यापीठाचे डॉ. रमेश पारिची, ज्ञानरुाोत केंद्राच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे, युजीसी – मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. मोहम्मद अतीक व ज्ञानरुाोत केंद्राचे सहसमन्वयक डॉ. विशाल बापते उपस्थित होते.कुलगुरू पुढे म्हणाले, डिजिटल लायब्रारीमुळे केवळ पुस्तकच नव्हे, तर संशोधन प्रबंध, शोधनिबंध, अहवाल आणि इतर अनेक प्रकारची माहिती एका क्लीकवर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थी आणि ज्ञान प्रेमींसाठी ज्ञानाची क्षितीजे आणखी खुली झाली आहेत. आजच्या कार्यशाळेच्या निमित्ताने सहभागी ग्रंथपालांना डिजिटल लायब्रारीच्या निर्मितीमध्ये एक नवी दिशा यातून मिळेल आणि त्यादृष्टीने भविष्यात आमचे सर्व ग्रंथपाल विद्याथ्र्यांना व वाचकांना अधिक सुविधा पुरवतील, असेही ते म्हणाले. विद्यापीठ ज्ञानरुाोत केंद्राने या कार्यशाळेच्या निमित्ताने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून डी-स्पेस तंत्रज्ञानाचा उपयोग डिजिटल लायब्रारी तयार करणे, त्याचे व्यवस्थापन आणि प्रभावीपणे वापर आदी विषयाची माहिती या कार्यशाळेमध्ये सहभागींना मिळणार आहे.प्रमुख अतिथी डॉ. रविंद्र कडू उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले, आपण सर्वजण ‘डी-स्पेस वापरुन डिजिटल लायब्रारी तयार करणे’ या विषयावर विचारमंथन करण्याकरीता एकत्रित आलो आहोत. ज्ञान साधनांच्या या प्रवासात डिजिटल लायब्रारी काळाची गरज बनली आहे. माहितीचे वाढते प्रमाण, संशोधन आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेता एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म असणे अत्यंत महत्वाचे आहे. पंचवीस वर्षानंतरही डी-स्पेस अज्ञावली इन्स्टिट¬ुशनल रिपॉझिटरी विकसित करण्यासाठी यथोचित असल्याचेही ते म्हणाले. आजची कार्यशाळा सहभागी सर्वांकरीता खूप उपयुक्त ठरेल आणि यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग सर्वजण आपल्या संस्थांमध्ये चांगल्या प्रकारे करतील, अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले विद्यापीठ गीताने व मान्यवरांचे स्वागत करुन कार्यशाळेला सुरुवात झाली. प्रास्ताविकतेतून ज्ञानरुाोत केंद्राच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे यांनी केंद्राद्वारे दिल्या जाणाया सुविधा व त्याचा महाविद्यालयांना आणि विद्याथ्र्यांना होत असलेला उपयोग, यावर प्रकाश टाकला. यावेळी उस्मानिया विद्यापीठाचे डॉ. रमेश पारिची यांनी डी-स्पेस वर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे त्रुशाल गुल्हाने यांनी, तर आभार सहसमन्वयक डॉ. विशाल बापते यांनी मानले. कार्यशाळेमध्ये विदर्भासह पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव आणि इतर जिल्ह्रांतून जवळपास दोनशेचे वर ग्रंथपाल सहभागी झाले होते.
