
तळेगाव दशासर/ मो.शकील
तळेगाव दशासर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत तळेगाव दशासर व गोडे मेडिकल कॉलेज अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावर शिबीर घेण्यात आले. या शिबिरात नाक कान घसा, अस्थिरोग, नेत्र रोग,स्त्री रोग,त्वचा रोग,इत्यादी प्रकारचे रोगांवर इलाज केल्या गेले तसेच औषधी मोफत वाटण्यात आली. ज्या पेशंटला ऑपरेशन व शस्त्रक्रियेची जरुरत आहे अशा पेशंटला 14 तारखेला अमरावती येथे गुडे कॉलेजला बोलावण्यात आले याकरिता जाणे येणे हा सर्व खर्च कॉलेजनेच केला आहे.
यावेळी 118 रुग्णांना औषधोपचार करण्यात आला.या शिबिरात रुग्णांची तपासणी करिता गोडे मेडिकल कॉलेज चे डॉ. खुशी गोयल,डॉ. प्रशिक शिरसाट,डॉ.सना खान,डॉ.मुकुंद सरोदे,डॉ.अमन हाशिर,डॉ.मोहम्मद शेख,डॉ.शितल मोरे,डॉ.चंद्रकांत काळे,व anm पूनम जयस्वाल.यांनी केली.या वेळी सरपंच मीनाक्षी ठाकरे अनिता मेश्राम विनोद देशमुख पुरुषोत्तम उडाके रमाकांत इंगोले आशा ठाकरे तनवीर खा शारदा बिरे संगीता गवळी गजू झिते इत्यादी हजर होते.