
पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते झाला सत्कार
तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपरी निपाणी यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन 2022-23 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावले आहे.हा गौरवाचा पुरस्कार दिनांक 19 जुलै 2025 रोजी एका भव्य समारंभात राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या विशेष समारंभाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये
मा. चंद्रशेखर बावनकुळे (पालकमंत्री, अमरावती)
श्रीमती श्वेता सिंघल (विभागीय आयुक्त, अमरावती)
श्री. आशिष येरेकर (जिल्हाधिकारी, अमरावती)
सौ. संजिता महापात्र (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती)
सौ. सौम्या शर्मा / चांडक (म.न.पा. आयुक्त)
मा. डॉ. अनिल बोंडे (खासदार, राज्यसभा)
मा. संजय खोडके (विधानपरिषद सदस्य)
मा. प्रविण पोटे (विधानपरिषद सदस्य)
मा. केवलराम काळे (आमदार, मेळघाट विधानसभा)
मा. राजेश वानखडे (आमदार, तिवसा विधानसभा)
मा. गजानन लवटे (आमदार, दर्यापूर विधानसभा)
मा. प्रवीण तायडे (आमदार, अचलपूर विधानसभा)
यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात पिंपरी निपाणीच्या सरपंच सौ. योगिता विशाल रिठे यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, तसेच रु. ६ लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या नेतृत्वाखाली गावाने स्वच्छता,पर्यावरण,कचरा व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या गौरवप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत,स्थानिक स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनाचे मोलाचे योगदान लाभले.ही कामगिरी गावासाठी प्रेरणादायी ठरली असून इतर गावांसाठीही एक आदर्श निर्माण करणारी आहे.पिंपरी निपाणीचा हा सन्मान गावाच्या एकजुटीचे व स्वच्छतेप्रती असलेल्या बांधिलकीचे फलित असल्याचे गावच्या सरपंच सौ योगिता विशाल रिठे यांनी सांगितले