
सरकारी गौण खनिज सरकारी कामासोबत शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यासाठी वापरण्यात यावे – सुखदेव पवार
अचलपूर / तालुका प्रतिनिधी
सरकारी गौण खनिज हे शेतकऱ्यांची रक्तवाहिनी असलेल्या पांदण रस्तासाठी वापरण्यात यावी अशी मागणी माजी जि प सदस्य सुखदेव पवार यांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी अचलपूर तालुक्यातील नदी नाले गाव तलाव पाझर तलाव खोलीकरणातून बाजूला पडलेले गौण खनिज शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याला वापरण्यासाठी जलसंपदा,लघु पाटबंधारे व जलसंधारण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देऊन तहसीलदार यांनी जवळच्या रस्त्यांना वापरण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देण्यात यावी तर गौण खनिज वापर संबंधित शासन निर्णयात अंशतः बदल करून शासनाच्या कामासोबत शेतकऱ्यांचे पांदण रस्ते ग्रामीण रस्ते आणि जिल्हा मार्ग यासाठी उपयोगात आणता येईल असे नमूद करावे.असे मत व्यक्त केले.या निर्णयाने या विभागातून त्या विभागात जाण्याचे ससेहेलपाटे थांबतील आणि रस्ते निर्माण कार्याला गती मिळेल.पांदण रस्त्यातील शेतीमालासाठी येणारेअडथळे दूर होण्यास मदत महत्वपूर्ण ठरणार आहे.असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुखदेव पवार आकाश मानकर छोटू सातपुते राहुल पिंपळकर उपस्थित होते.