
वयाच्या 83 वर्षाच्या काळात घेतला अखेरचा श्वास
चांदुर बाजार /एजाज खान
अमरावती येथील अंबापेठ येथील प्रतिष्ठित नागरिक व गो सी टोम्पे महाविद्यालय चांदुर बाजारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री भास्करराव टोम्पे दादा आणि आदरणीय श्री विजयराव टोम्पे दादा यांचे वडील आदरणीय श्री केशवराव गोविंदराव टोम्पे यांचे आज 12:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
वयाची 83 वर्ष पूर्ण करून त्यांनी आज दुपारी 12.45 वाजता इहलोकी ची यात्रा संपवली.त्यांच्या जाण्याने त्यांच्या मागे 2 मुले 3 मुली जावई व नातवंड असा भरपूर मोठा परिवार आहे त्यांनी चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी करिता शिक्षण क्षेत्र व सामाजिक क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेतली होती त्यांना अमरावती जिल्ह्यातील नागरिक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख होते नेमही ते गरजूवंतांना मदतीचा आधार द्यायचे आज त्यांच्या जाण्याने अमरावती जिल्ह्यामध्ये व चांदूरबाजार तालुक्यामध्ये पूर्णता शोककळा पसरली आहे त्यांना आज निर्मिती पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तर गो सी टोम्पे महाविद्यालय सर्व कर्मचारी व चांदूरबाजार तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक , महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी सर्व संघटना , पत्रकार संघटना , यांच्यातर्फे सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली आहे