
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाने बरेच दिवस विश्रांती घेतल्यानंतर दिनांक 16 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस बरसला तालुक्यातील गोळेगाव जगतपुर या गावा मधोमध साखळी नदी असून मुसळधार पावसामुळे पूर आला . दोनही गावातील नागरिकांचा संपर्क तुटला असून येजा थांबले आहेत.दोन वर्ष झाले असताना सुद्धा पुलाचे बांधकाम चालू असून गोळेगाव- जगातपूर या गावाचा संपर्क जोडावा व पावसाळ्यात येणे जाण्याकरिता रस्ता सुखद व्हावा. परंतु संबंधित विभाग व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही पूल पूर्ण झाला तर नाहीच मागील वर्षी पुलाकरिता खड्डे खोदून ठेवण्यात आले. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले पाणी साचलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे एका लहान मुलांचा खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झाला. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा कुंभकर्णीय प्रशासनाला अद्यापही जाग आलेला नाही. विकसित भारताचे स्वप्न पाहत असताना दोन वर्षापासून रखडलेला पूल अद्यापही पूर्ण होत नाही. याला विकसित भारत म्हणाव का असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला.