
स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणची कामगिरी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे परिसरातील गोदामांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रशासन चिंतेत होते. अशातच २३ जून २०२५ रोजी तांदूळ व्यापाऱ्याच्या गोडाऊनमधून १,२५,००० रुपये किमतीचा तांदूळ चोरीला गेल्याची फिर्याद दिली गेली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणला यश आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटकेत असलेले आरोपी पुढीलप्रमाणे:
१. मयूर प्रमोद कांबळे, वय २६ वर्ष, रा. धामणगाव रेल्वे
२. सागर नितीन शिंदे, वय २६ वर्ष, रा. धामणगाव रेल्वे
३. निलेश अशोक शेंडे, वय २५ वर्ष, रा. अंजनगाव, ता. धामणगाव रेल्वे
४. सचिन सतीश गायकवाड, वय ३६ वर्ष, रा. धामणगाव रेल्वे
५. अमन व्यास, रा. तत्पर
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंदराव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे चोरीचा मुख्य सूत्रधार मयूर कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. त्याने आपल्या साथीदारांबरोबर मिळून ही चोरी केली होती. आरोपींनी चोरीचा तांदूळ सत्कार्यातील कॅन्टीन मार्केट चौकात विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी सापळा रचून सर्व आरोपींना अटक केली.या दरम्यान आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल – सुमारे १,२५,००० रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:पोलीस अधीक्षक विशाल आनंद
अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,पोलीस निरीक्षक किरण बावणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक – प्रदीप भाऊडकर, अमोल शेंपूळे, मोहन लळके, शंकर मसे, नितीन कोंडजीनाथ, चालक को.पा. प्रशांत बावनकर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांचा समावेश होता.