
श्री राम गणेशोत्सव मंडळाचा अभिनव उपक्रम
घाटलाडकी / मनोज बारस्कर
यावर्षी गणरायाचे आगमन 27 ऑगस्टला होणार असून घाटलाडकी येथील सर्वच मंडळाचे कार्यकर्ते अति उत्सहात गणरायचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. यात प्रामुख्याने जय श्रीराम गणेशोत्सव मंडळ एकता नगर, गुरुदेव सेवा मंडळ बारीपुरा, रामदेव बाबा गणेश उत्सव मंडळ बारीपुरा, तुळसामाता गणेशोत्सव मंडळ धोटी पुरा, बाजारचा राजा गणेशोत्सव मंडळ बाजार चोक, जय भवानी गणेशोत्सव मंडळ, जागृत गणेशोत्सव मंडळ, रामकरण बाबा गणेश उत्सव मंडळ श्री बाल गणेश मंडळ राममंदिर येथे, जय अंबे गणेश मंडळ देवीनगर अस्या सर्वच गणेश मंडळात दरवर्षी गणपती उत्सव हा अतिशय थाटात साजरा केला जातोय.अनेक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाला सर्वच मंडळ प्राधान्य देत असते यात सर्वात महत्वाचे म्हणजे महाप्रसाद हा गावासह इतर परिसरातील गावासाठी आयोजित प्रत्येक मंडलात मोठया प्रमानातं साजरा होत असून प्रत्येक मंडळात वेगवेगळ्या दिवशी महाप्रसाद होत असतो या वर्षी श्री राम गणेशोत्सव मंडळ एकता नगरचे यंदा १९ वे वर्षअसून मंडळ दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवते. यंदा खाली प्लॉट मालकाकडून ना हरकत घेतल्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी रिकाम्या प्लॉटमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. गणेशोत्सवाच्या महाप्रसाद साठी त्याचा वापर होणार आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे..या मंडळात 100 हून अधिक सदस्य आहेत. मंडळातर्फे दरवर्षी भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गावात अनेक मोकळे भूखंड पडले आहेत. त्यामुळे काही मोकळ्या भूखंडांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मंडळा तर्फे तरुणांनी त्यांची स्वच्छता करून पालक आणि कोथिंबीर पेरली. यामुळे ग्रामस्थांना अस्वच्छतेपासून दिलासा मिळाला असतानाच तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.असे उपक्रम प्रत्येक मंडळानी हाती घेतल्यास.चांगला उपक्रम राबविल्या जाईल.
आमच्या घाटलाडकी येथे दरवर्षी मोट्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जातो यात महाप्रसादाला जास्त प्राधान्य दिले जाते या वर्षी आम्ही खाली प्लॉटवर भाजीपाल्याची लागवड केली असून त्यांचा उपयोग महाप्रसादासाठी होणार आहे या वर्षी दिनांक 30 शनिवार रोजी भव्य असा महाप्रसाद होणार आहे..
प्रवीण कुऱ्हाडे,अध्यक्ष जय श्री राम मंडळ एकता नगर