
दलाल अन् माफियांचाच फायदा
एका ब्रास रायल्टीवर अनेक ब्रास रेती उत्खनन सुरू
नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे
शासनाच्या विविध घरकुल योजनांसाठी मोफत रेती देण्याची योजना सरकारकडून आणण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्यक्षात मात्र या योजनेची अंमलबजावणी होताना दिसून येत नाहीये घरकुल धारकांना मोफत रेती भेटण्याऐवजी त्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे.वाळू मोफत मिळेल असं सरकार सांगतंय पण वस्तुस्थिती वेगळीच आहे,तालुक्यातील बेबळा नदी नाले तून रेती काढण्यासाठी एक ट्रॅक्टर ट्रीपचं दर 2000 रुपये आहे.असे 5 ट्रॅक्टर लागतात ज्याला खर्च 10,000 रुपये येतोय. यानंतर याप्रमाणे सामान्य नागरिकाला तब्बल 30 हजार ते 35 हजार रुपये मोजावे लागत आहेत.खरं तर मोफत रेती योजना जनतेच्या फायद्यासाठी होती.पण सध्या ती खासगी दलाल आणि ट्रॅक्टर मालकांच्या फायद्याची बनली आहे.आता तरी याकडे तहशिदार यांनी लक्ष घालावं,आणि वाळूचा हा ‘रेतीमाफिया’चा बाजार बंद करावा अशी मागणी होत आहे.
खासगी दलाल, एजंट अन,ट्रॅक्टर मालकाचा वाटा
शासनाने जाहीर केलेल्या मोफत रेती योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ नागरिकांना घरबांधणीसाठी मदत मिळावी. पण इथे ही योजना दलाल आणि माफियांकडून हडप केली जात असल्याचा आरोप होत आहे. मोफत रेतीचे नियमानुसार वितरण न होता तीच रेती नागरिकांना पैसे मोजून खरेदी करावी लागत आहे. काही ठिकाणी तर यासाठी हप्ते पद्धतीनेही पैसे घेतले जात असल्याचे सांगण्यात येत आहे? रेती मोफत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना एका ट्रॅक्टर रेतीसाठी तब्बल 7 हजार ते 10 हजार रुपये मोजावे लागत आहेत. एका हायवासाठी सुमारे 5 ट्रॅक्टर गरज भासते. एका ट्रिपसाठी साधारण 2000 रुपये घेतले जातात. यावरच सुमारे 10,000 रुपये खर्च होतो. त्यानंतर या रेतीचं ट्रॅक्टर भरणं, त्याचं ट्रान्सपोर्टिंग यासाठी अतिरिक्त 5000 रुपये आकारले जातात. त्यात ट्रॅक्टर मालक, दलाल, खाजगी एजंट यांचाही वाटा असतो. या सगळ्या प्रकारामुळे घरकुल योजनेचे मूळ उद्दिष्टच हरवत चालले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनेचा लाभ खाजगी ट्रॅक्टर मालक आणि रेती दलाल घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.