धारणी/तालुका प्रतिनिधी
दि. २४/०६/२०२४ रोजी धारणी पोलीस स्टेशन हद्दीत घरगुती वादातून पत्नीवर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी राजकुमार ऊर्फ गोपू रामसिंग ठाकरे, वय ३५ वर्षे, रा. धारणी यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पत्नीच्या वारंवार झालेल्या छळामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या संदर्भात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. पोलिस अधीक्षक अमरावती विशाल आनंद यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले होते.दि. २०/०८/२०२४ रोजी रात्री धारणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी राजकुमार ऊर्फ गोपू रामसिंग ठाकरे यास धारणी येथून ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.या कारवाईत श्री. विशाल आनंद, पोलिस अधीक्षक, श्री. जे. डी. फड, अप्पर पोलिस अधीक्षक, श्री. अशोक गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी, तसेच पोलीस निरीक्षक श्री. अविनाश देशमुख, पो. उपनिरीक्षक श्री. अनिल नवले, पो. हे. का. अमर राठोड, पो. ना. मोहित आक्कल, पो. ना. दिलीप तैलांगडे, पो. शंकर सिंग, पो. सुमनराव यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
