७३५०० ची रोकड व ऐवज चोरीला
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी शहरातील उस्मानपुरा येथे घराला कुलुप असल्याचे पाहुन चोरट्यांनी हात साफ करत ७३५०० चा ऐवज चोरी केला. स्थानिक उस्मानपुरा येथील टेलर काम करीत असलेले अब्दुल खालीक अब्दुल जलील (४६) दि.११ रोजी परतवाडा येथे नातेवाकाईका कडे मुक्कामी गेले होते. दुसरे दिवशी(दि. १२) ला परत आले असता घराचे दरवाजाचे लॉक तुटलेले आढळले, घरात प्रवेश केला असता घरातील हॉलमधील पेटयामधील सामान ईतत्र विखुरलेले दिसले. आलमारीमधील लॉकर मध्ये ठेवलेले नगदी रुपये १५०००, ८ व ६ग्रॅमची सोन्याचे पोत .कींम३२,००० व २४००० असा एकुन ७१००० चोरट्याने लंपास केलेला आढळला तसेच घराचे मागच्या राहत असलेल्या इरफान खान इनायत खान यांचे घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात चालवत असलेल्या किराणा दुकानातुनही चोरट्यांनी गल्ल्यातील २५०० रुपयचे रोख रक्कम चोरुन नेली अ. खालीक अ. जलील यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे चोरी बाबत तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भान्यास ३०५,३३१(५) प्रमाने गुन्हे दाखल केले आहेत.
