
मोर्शी / संजय गारपवार
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्य वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार सर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी सुरक्षित मातृत्व, स्तनपनाचे महत्त्व, स्तनपानाला बसण्याची पद्धत तसेच मातेचा आहार याबाबत काय काळजी घ्यावी तसेच बाळाचे कुपोषण बालमृत्यू दर कमी कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ ऋतुजा श्रीराव मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिपरिचारिका जयश्री मोरे यांनी केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ आंडे मॅडम डॉ गिरीश धोटे रुग्णालयाच्या परिसेविका वर्षा दारोकर सुमन जावरकर कल्पना पंधरे पुष्पा पंधरे भारती राऊत अर्चना पवार कांचन राऊत सुजाता पांडे, विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, आशिष पाटील व इतर कर्मचारी हजर होते.