अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित झाल्या जवळपास महाराष्ट्रातील तीनशे महिला पैलवानांनी यामध्ये सहभाग घेतला होता अमरावती शहर जिल्हा कुस्ती संघाच्या महिला पैलवान गौरी धोटे यांनी 72 किलो वजन गटात सहभाग घेऊन हिने कास्यपदक पटकावले अतिशय प्रेक्षणीय लढत देऊन या अमरावती शहराचे नाव तिने नोकरी केले गौरी वसंत धोटे ही हनुमान् व्यायाम प्रसारक मंडळाची खेळाडू असून हिचे वडील अमरावती शहर पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे अतिशय होतकरू महिला पैलवान असून चारदा अमरावती विद्यापीठ चॅम्पियन झालेली अनेकदा महाराष्ट्र मधील मेडल घेतलेली मुलगी आहे उच्चशिक्षित आहे. अमरावती जिल्ह्याच्या महिला जगत तथा कुस्ती क्षेत्रामध्ये गौरीने मेडल आणल्यामुळे एक आनंदाचे वातावरण निर्माण होऊन अनेक मुली कुस्ती खेळाकडे आकर्षित होत आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ सौ.माधुरी चेंडके,प्राध्यापक रवींद्र खांडेकर डॉक्टर संजय तीरतकर अँड प्रशांत देशपांडे,डॉक्टर श्रीकांत चेंडके यांनी गौरीचे अभिनंदन केले.
