धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठाणचे आयोजन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
येथील धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठाण गरबा नृत्य स्पर्धा दि.२५ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता सखा मंगलम्, यशोदानगर अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती.सदर प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षी जागर जिजाऊ सविञी कार्यक्रमांतर्गत गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये शेकडो महिला,लहान मूली ,मुलांनी भाग घेतला यामध्ये प्रथम विजेता हनी डान्स ग्रुप,द्वितीय नृत्यरंग ग्रुप व आर. डी.सी.ग्रुप तृतीय श्री गोविंद ग्रुप, व सिद्धी दात्री ग्रुप तर प्रोत्साहन पर पंखुडी ग्रुप तसेच कॉमन गरबा मध्ये लहान मुलांमध्ये प्रथम आराध्या , द्वितीय सई काळे, तृतीय देवांशी तर मोठांमध्ये प्रथम खुशी सोनेने , द्वितीय रश्मी देशमुख, तृतीय सीमा पाठेकर इत्यादी स्पर्धकांना रोख पारितोषिक,प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी उपमहापौर श्रीमती संध्याताई टिकले तर अध्यक्ष म्हणून अश्विन चौधरी तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. प्रफुल्ल गुडधे, प्रा.शोभना देशमुख, सुरेखा लुंगारे, सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर, ॲड. आशिष हाडके, अविनाश मार्डीकर, यांची उपस्थिती होती या गरबा नृत्य स्पर्धेचे परीक्षण अंबु सेदानी,पूर्वा मागें यांनी केले तर सूत्रसंचालन प्रीतम आर्मल यांनी केले तर प्रास्ताविक धनश्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजू ठाकरे यांनी केले गरबा नृत्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरती बोंदरकर, सुचित्रा लहाने, पल्लवी बावस्कर, कुंदा पुसदकर, पल्लवी पागृत,स्वाती काळे,पूजा रडके, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
