शहरातील मुख्य मार्गाची केली पाहणी
ठाणेदार श्रीराम लांबडे यांनी केले नेतृत्व
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
आगामी गणेश उत्सव तसेच इतर सण-उत्सव शांततेत, कायदा व सुव्यवस्था राखत पार पडावेत यासाठी नांदगाव खंडेश्वर पोलिसांकडून शहरातील मुख्य मार्गावरून भव्य रूट मार्च काढण्यात आला.या रूट मार्चचे नेतृत्व नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी केले.

त्यांच्यासोबत सपोनि मुंढे, PSI ब्राम्हणे, स.फौ. खंडारे तसेच पोहेका पोकळे, पोहेका वानखडे, पोहेका गवई, पोहेका पांडे, पोहेका निकोसे, पोका गजभिये आणि पोका निखिल मेटे यांचा सक्रीय सहभाग होता.रूट मार्च दरम्यान शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी पोलिसांनी पायदळ फेरी मारून नागरिकांशी संवाद साधला.

उत्सव काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, शांतता व सौहार्दाचे वातावरण टिकावे यासाठी पोलिस प्रशासन सदैव दक्ष असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, उत्सव काळात नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करून आपला सण उत्साहात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी केले.
