
मोर्शी/ संजय गारपवार
भारतीय स्वतंत्र्याच्या 78 व्या गणतंत्र्याची औचित्य साधून दि. 14 ऑगस्ट रोजी वनविभाग मोर्शी, शिवाजी हायस्कूल मोर्शी, पोलीस स्टेशन मोर्शीच्या संयुक्त विद्यमानाने वनविभागाच्या कार्यालयापासून भव्य मोटरसायकल व सायकल रॅली काढण्यात आली होती.या रॅलीला वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी मोटर सायकल व सायकल झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती.
सदर रॅली तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन नवीन बसस्थानक,शिंभोरा चौक मार्गे जयस्तंभ चौक या मार्गाने काढण्यात आली होती. या रॅलीत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, व इतर शिक्षक वृंद एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते.