
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका येथे (बर्मीगह्यम) जागतिक पोलीस गेम्स मध्ये धनुर्विद्या या खेळात 1 सुवर्ण तर 2 रौप्य पदक प्राप्त केले दि. 4 ऑगस्टला परत आल्यावर गौरव चांदने याची एकलव्य क्रीडा अकादमीचे खेळाडू व पालकांनी. जाहीर सत्कार समारंभ व गावातून भव्य मिरवणूक रॅली काढून. गावांमधील नागरिकांनी घरोघरी आरती काढून औक्षवंत करून स्वागत केले. गौरवने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल. सर्व क्रीडाप्रेमी व गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. स्वागताकरिता आमदार प्रताप दादा अडसड, निवृत्ती भालकर( मुख्याधिकारी नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर ) प्रसाद संकपाळ ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर ). विलास बाबरे ( विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर ) संजय पोफळे ( माजी नगराध्यक्ष ) अक्षय पारसकर ( माजी नगराध्यक्ष) प्रकाश मारोटकर,घनश्याम सारडा, राजू पाठक, मुन्ना जोशी, हरिश्चंद्र खंडाळकर, अरुण लहाबर, सतीश पटेल, अमोल इंगोले, मुन्ना मानतकर, यांनी स्वागत करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.गौरव चांदणे यांनी वयाच्या 14 व्या वर्षी धनुर्विद्या खेळाचे बाळकडू. एकलव्य क्रीडा अकादमी चे संस्थापक सदानंद जाधव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व एन. आय. एस. कोच अमर जाधव. यांच्या मार्गदर्शनाखाली केली गौरव यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, सीनियर स्पर्धा, नॅशनल गेम्स, अशा विविध स्पर्धेत अनेक पदके प्राप्त केली असून. त्याची दखल घेऊन सन 2023-24 मध्ये. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार देऊन सन्मानित केले. सध्या तो दिल्ली येथे आयटीबीपी मध्ये कार्यरत आहे. दिल्ली येथील पोलीस सेंटर मध्ये गौरवचा सराव सुरू आहे. त्याच्या या यशाबद्दल एकलव्य क्रीडा अकादमी नांदगाव खंडेश्वर येथे जाहीर सत्कार घेण्यात आला. सत्काराला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. गणेश जाधव ( जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती ) प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर मुंदे साहेब, पोलीस उपनिरीक्षक ब्राह्मणे साहेब, माजी सरपंच विठ्ठलराव चांदणे, उत्तम मुरादे, नारायण वैष्णव, शिवाजी हायस्कूल प्राचार्य पी आर ठाकरे, शिक्षक गोवर्धन सर, पांडेय महाराज, उपस्थित होते. गौरव व त्याचे आई वडिलांचा व त्याच्या सर्व परिवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व एकलव्य अकादमीचे पदाधिकारी मार्गदर्शक यांनी केला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून एकलव्य क्रीडा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सदानंद जाधव( शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त ) यांनी बोलताना सांगितले गौरव चांदणे सारखे अनेक खेळाडू या ग्रामीण भागातून देशाला पदक प्राप्त तयार होण्यासाठीच एकलव्य क्रीडा अकादमीची निर्मिती केली आहे. ऑलम्पिक मध्ये देशाला पदक प्राप्त खेळाडू निर्माण व्हावे. या उद्देशाने एकलव्य क्रीडा अकादमीची वाटचाल सुरू आहे. परंतु शासनाने ग्रामीण भागातील खेळाडूला लागणाऱ्या खेळ साहित्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास. निश्चितच भविष्यात ऑलम्पिक मध्ये या एकलव्य अकादमीचा खेळाडू राहील अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल ढवळे, अनुप काकडे, पवन जाधव, महेंद्र मेटकर,प्रा. गजानन काकडे, प्रतीक पोकळे, हिमांशू चरडे,, कल्पेश दैत, सुमित गुरुमुळे, साक्षी तोटे, श्रेया खंडार, एकलव्य गुरुकुल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मारोटकर यांनी केले.