
डॉ.विकास खंडारे मुख्याधिकारी ,नगर परिषद चांदुर रेल्वे यांचे अत्यंत कौतुकास्पद निर्णय
चांदुर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
नगर परिषद ,चांदुर रेल्वे अंतर्गत कार्यरत असलेले दीर्घकाळापासून सेवा बजावणारे सफाई कर्मचारी श्रीमती शिलाबाई राजू कनोजे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या सेवाकालात निष्ठेने प्रामाणिकपणे व मनापासून काम करत सफाई विभागात महत्त्वपूर्ण योगदान दिले.सेवानिवृत्ती पश्चात त्यांच्या जागेवर लाल पागे समितीच्या परिपत्रक अनुसार त्यांच्या ,जागेवर वारसा प्रमाणे त्यांचा सुपुत्र विशाल राजू कनोजे याला वारस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रथमदा झाले आहे की वारसा हक प्रमाणे ज्या दिवशी कर्मचारी यांना सेवानियुक्त करण्यात आले त्या दिवशी त्यांच्यावर वारसाला नियुक्त प्रदान करण्यात आलेली आहे . मा.डॉ.विकास खंडारे मुख्याधिकारी साहेब यांच्या या निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून गरजू व काम करण्याची इच्छाशक्ती असलेल्या वारसांना संधी देणारा आहे.या निर्णयामागे मा.मुख्याधिकारी श्री डॉ.खंडारे साहेब यांचे मार्गदर्शन सहकार्य आणि माणुसकीची भावना यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे एक परिवार आर्थिक दृष्ट्या सशक्त झाला असून त्यांचा उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरु झाली आहे.या मानवी व संवेदनशील निर्णयाबद्दल संपूर्ण मेहतर समाज ,सामाजिक संघटना व सफाई कर्मचारी चांदुर रेल्वे यानी समाधान व्यक्त केलेला .असून सर्वांनी मा.डॉ.विकास खंडारे मुख्याधिकारी साहेबांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहे .