
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
टेंभा ता अमरावती येथील कर्तव्यनिष्ठ,समाजाभिमुख ग्राम महसूल अधिकारी डॉ.पवन राठोड यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच कांताबाई सा. वाहने, मुख्य अतिथी श्री अभिजीत देशमुख महसूल मंडळ अधिकारी व अर्चना टेकाडे ग्राम महसूल अधिकारी व गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते
उच्च विद्या विभूषित डॉ.पवन राठोड यांचा याप्रसंगी शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.प्रसंगी ग्रामस्थांनी डॉ.पवन राठोड यांच्या कार्यकर्तुत्वा विषयी आपले मते मांडताना त्यांच्या कार्यप्रणाली व ग्रामस्थबाबत असलेली आपुलकी व जबाबदारी तसेच आपले कर्तव्य पार पडताना ग्रामस्थांच्या अडी अडचणीचा विचार करून कोणतेही काम जलद गतीने करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे ग्राम महसूल अधिकारी हे क्वचितच असावेत असे देखील ग्रामस्थांनी नमूद केले व या कार्यालयाच्या अभिलेख व नोंदी देखील अद्यावत करून ग्रामस्थांना व येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास सुलभ केल्याचे मत देखील मांडण्यात आले.
याप्रसंगी डॉ. पवन राठोड याकार्यक्रमा स सत्काराचे उत्तर देताना विद्येचे महत्त्व जाणून गावातील वाचनालया करिता १०,०००/-रुपयांची देणगी जाहीर केली व ग्रामवासीयां नी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या वेळी ग्रामस्थांनी देखील शाल, श्रीफळ, हेल्मेट, पुस्तके विविध भेटी देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी महसूल मंडळ अधिकारी
श्री अभिजीत देशमुख यांनी पवन राठोड यांच्या कार्य कुशलते विषयी व कामाच्या प्रती असलेल्या निष्ठेबाबत अभिनंदन केले सरपंच कांताबाई सागर वाहने यांनी कार्याविषयी आपल्या मनोगता मधून यथोचित गौरव केला.
या कार्यक्रमाचे संचालन श्री सुनील तायडे, प्रास्ताविक श्री रवी मोरे तर आभार प्रदर्शन श्री वैभव कदम यांनी केले.
या भावनिक कार्यक्रमासश्री राजेंद्र शेंडे, पंडितराव ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे, सुरेशराव मोरे, अनिल बादशे, मोहन ठाकरे,अमर ठाकरे आदी मान्यवरासह सर्व शेतकरी निरोप समारंभ सोहळ्यात सहभागी होते…. ग्रामपंचायत,सेवा सहकारी संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.