
२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांची यशस्वी कारवाई
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
चांदूर बाजार व अंजनगाव सुर्जी परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) यांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन आरोपींसह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्जात एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चोरीची तक्रार व प्राथमिक तपास दिनांक 14 जुलै 2025 रोजी,अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात निकेश सहदेवराव राऊत (वय 32, रा. मातंगपुरा) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिनांक 10 जुलै रोजी रात्री त्यांच्या घरासमोर उभी केलेली बजाज एन.एस.पल्सर (MH-27-DJ-5054) दुचाकी 11 जुलै रोजी सकाळी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 341/2025 नुसार भादंवि कलम 316, 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षकांचे निर्देशानुसार तपासाला गती सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद (अमरावती ग्रामीण) यांनी जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.तपासात खालील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत त्यामध्ये सैय्यद जुबेर सैय्यद मोबीन, रा. साईनगर,चांदूर बाजार.अब्दुल शहजाद अब्दुल रऊफ, रा. पिपलपुरा,गाडगेनगर,चांदूर बाजार,वसीम खान आबीद खान (वय 39), रा. ताज नगर चांदूर बाजार त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षित बालकांचाही समावेश असल्याचे उघड झाले.चोरीची कबुली व मुद्देमाल जप्त पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी अंजनगाव सुर्जी,चांदूर बाजार व वरुड येथील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी क्रमांक 03 वसीम खान याच्याकडून चोरी केलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये बजाज एन.एस. पल्सर (MH-27-DJ-5054) – 60,000 रुपये,होंडा शाईन (पो.स्टे. चांदूर बाजार गुन्हा क्र. 240/2025) 50,000 रुपये होंडा स्प्लेंडर मोसा (पो.स्टे. वरुड गु.क्र. 315/2025) – 50,000 रुपये,यासह 14 मोबाईल फोन 1,40,000,एक एन.एस. पल्सर (MH-27-DQ-2245) 50,000रुपये असा एकूण जप्त मुद्देमाल 2,90,000 रुपयाचा असून आरोपी क्र. 01 व 02 यांना पो.स्टे. अंजनगाव सुर्जी येथे आरोपी क्र. 03 याला पो.स्टे. चांदूर बाजार येथे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे (स्थानीय गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पो.उप.नि. नितीन इंगोले,पो.हे.कॉ. सुनील महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे, हर्षद घुसे,सायबर पो.स्टे.चे पो.हे.कॉ.सागर थापड, शिवा शिरसाठ,रितेश गोस्वामी,विकास अंजीकर यांचा सहभाग होता.अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड झाली असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा तपासात लक्षणीय प्रगती दर्शवतो.पोलीस दलाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.