धामणगाव रेल्वे/ सलील काळे
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने प्रगती साधत असताना धामणगावचे सुपुत्र डॉ. ऋषिकेश सोपानराव शाहाकार यांनी आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांना नुकतीच Doctorate in Electrical Engineering ही पदवी मिळाली असून यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. डॉ. शाहाकार यांनी Government College of Engineering, Aurangabad येथून M.Tech पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी Government College of Engineering, Amravati (Sant Gadgebaba Amravati University) येथून Ph.D. संपादन केली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता – “Design and performance analysis of novel single phase grid connected transformerless inverter.” हे संशोधन कार्य डॉ. कविता डी. ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली झाले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले आणि इलेक्ट्रिकल विभागातील प्राध्यापकांचेही विशेष सहकार्य लाभले.या यशस्वी प्रवासात पत्नी नूतन ठाकरे, मित्र अभिषेक अरविंद चनेकर, वडील, आई, बहिण तसेच सासरच्या मंडळींचा मोठा आधार आणि मदत लाभल्याचे डॉ. शाहाकर यांनी कृतज्ञतेने सांगितले.त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीमुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील संशोधन व कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
