वाढदिवसानिमित्त सहपरिवार सन्मान,केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिल्या विशेष शुभेच्छा
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
अमरावतीचे सुपुत्र डॉ मनीष शोभा शंकरराव गवई खासगी सचिव मा अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्रालय व राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकार,विशेष निमंत्रीत सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या मुलाचा आर्यचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी नुकता साजरा करण्यात आला असून याप्रसंगी डॉ मनीष गवई व डॉ अनिता गवई यांचा सहपरिवार सामाजिक सन्मान देखील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवधारा आश्रम अमरावतीचे साई डॉ संतोषदेवजी महाराज हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तथागत टीव्हीचे संचालक अरुण वानखडे,डॉ रोमा बजाज,डेटाराम मनोजा, संपादक विजयकुमार गायकवाड,क्रांती भूषण खडसे, विशुद्धानंद जवंजाळ, डॉ राजेंद्र सिंग अरोरा, राजकुमार राजदेव डॉ द्वारकादास अडवाणी, अश्वमेघ संस्थेचे नितीन पांडे, हुकूम, मेकअप आर्टिस्ट वैशाली काळे मालवीय सह अन्य मान्यवर उपस्थित होते डॉ मनीष गवई यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमीत्त गरिब गरजूंना मोफत अन्न, वस्त्र, शाल; चादर ब्लँकेट; कपडे यांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या वाढदिवसानिमित्त खास दूरध्वनीद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांनी डॉ मनीष गवई यांच्या मुलगा आर्यला विशेष शुभेच्छा दिल्या आणि जीवनात आर्यने खूप मोठे व्हावे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खूप शिकावे आणि आपल्या परिवाराचे आणि समाजाचे नाव उंच करावे असा आशीर्वाद सुद्धा त्यांनी दूरध्वनीद्वारे याप्रसंगी दिला.याप्रसंगी डॉ मनीष गवई आणि डॉ अनिता गवई यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने 50 किलोच्या हाराने विशेष सन्मान करून त्यांचा गौरव याप्रसंगी करण्यात आला याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ गवई यांनी अमरावतीकरांचे आभार मानले ज्या मातीतून मी जन्म घेतला आहे त्या मातीचे पांग फेडण्याची जबाबदारी माझी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले मी जरी दिल्लीत असलो तरी माझा ऋणानुबंध अमरावतीशी जोडलेला आहे आणि अमरावतीच्या प्रत्येक जळणघडणीत माझा सहभाग हा दिल्लीवरून मी देत असतो माझे सौभाग्य आहे की मला दिल्लीपर्यंत यशाचे शिखर गाठता आले ज्यामुळे आज मी दिल्लीत अमरावतीचे नाव रोशन करीत आहे याप्रसंगी राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेच्या वतीने प्रबोधन पर गीतांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विशेष करून सुप्रसिद्ध गायक दीपक इंगळे यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले या सामाजिक वाढदिवस उपक्रम सोहळ्याला अमरावती शहरातील गणमान्य व्यक्ती विशेष करून उपस्थित होत्या यामध्ये प्रलहाद गवई , संगीता गवई,सुरत वरून अमित वानखडे, राहुल साळवे,बालकृष्ण वानखडे, शरद थोरात, ललिता वानखडे, उमेश तायडे सोनल वानखडे, स्वाती गवई साळवे, कुणाल मनवर, उमेश तडस, रिषभ बावणे, प्रीती मनवर शालिनी धोके कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैभव निमकर यांनी केले तर आभार निलेश दाभणे यांनी मानले.
